वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन सुरक्षा परिषदेची नुकतीच बैठक झाली. या परिषेदेचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर नियंत्रण ठेवावे. विविध प्रातांमधून लोकांना स्थलांतरण करावे लागल्याने काबूलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे. सर्व पक्षांनी नियमांचे पालन करून नागरिकांच्या हितांचे संरक्षण करावे, अशी गटेर्रस यांनी विनंती केली आहे. आता अशा प्रकारे अत्याचार सुरु झाल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
सर्व देशांनी अफगाणिस्तानी निर्वार्सितांना स्वीकारावे आणि त्यांना पाठवून देण्याचे टाळावे. तालिबान आणि सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय मानवता हक्क, अधिकार, सर्व नागरिकांच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करावे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी आवाहन केले.
हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलच्या उत्पादन शुल्कात होणार नाही कपात, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले 'हे' कारण
पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती-
अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती वाढत आहे. पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती आहे. अफगाणिस्तान महिला आणि मुलींच्या हक्कांचे सरंक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या विविध हक्कांवर गदा येण्याची भीती
अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी सदस्य आणि प्रतिनिधी गुलाम एम. इसाकझाई म्हणाले, की अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या विविध हक्कांवर गदा येण्याची भीती आहे. हे मी अफगाणिस्तानमधील लाखो लोकांच्यावतीने बोलत आहे. मी अफगाणिस्तानमधील लाखो महिला आणि महिलांचे स्वातंत्र्य गमविणार असल्याविषयी बोलत आहे. त्यांना शाळेत जाणे, राजकीय आणि सामाजिक जीवनात सहभाग घेण्याचे स्वातंत्र्य गमवावे लागेल, अशी भीती आहे.
हेही वाचा-'या' तीन गोष्टी केल्या तर आरक्षण मिळेल !, शरद पवारांचा मोलाचा सल्ला