ETV Bharat / international

सौर ऊर्जेबाबत संयुक्त राष्ट्राकडून भारताची प्रशंसा; पर्यावरणाविषयी जगभरात प्रयत्न सुरू

author img

By

Published : Dec 6, 2020, 7:47 PM IST

संयुक्त राष्ट्रात 'जनता आणि हवामान' या विषयावर वेबसंवाद आयोजीत करण्यात आला होता. यावेळी सौर ऊर्जेबाबत भारतातील काम आणि उद्योगांमध्ये होत असलेल्या बदलांचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले आहे.

यूएन
यूएन

न्युयार्क - सौर ऊर्जेबाबत भारतातील काम आणि उद्योगांमध्ये होत असलेल्या बदलांचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले आहे. जग आपले लक्ष्य वेळेवर साध्य करेल, हे अपेक्षित आहे, असे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रात 'जनता आणि हवामान' या विषयावर वेबसंवाद आयोजीत करण्यात आला होता. पर्यायवरणाबाबत जगभरात होत असलेल्या प्रयत्न उत्साहवर्धक असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या उप-महासचिव अमीना मुहम्मद यांनी म्हटलं.

पर्यावरणाविषयी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. 110 देशांसह हवामानातील कार्बन कमी करण्यासाठी जपान आणि कोरिया चांगले काम करत आहेत. 2050 पर्यंत आपण आपले लक्ष्य गाठू, असे या दोन्ही देशांचे म्हणणे आहे. युरोपियन संघ 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात 55 टक्क्यांनी घट करण्याचे काम करीत आहे. त्यानी सौरऊर्जेवरही वेगाने काम केले पाहिजे, असे अमीना मुहम्मद म्हणाल्या.

कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अनलॉक झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला अशा पद्धतीने पुन्हा रुळावर आणावे की, ज्यामुळे रोजगार निर्मिती होईल, असेही त्या म्हणाल्या.

जगभरात सरासरी दरडोई कार्बन उत्सर्जन -

प्रतिवर्षी संपूर्ण जगभरात सरासरी दरडोई कार्बन उत्सर्जन 1.3 टन इतके नोंदवले गेले असून त्यात अमेरिका 4.5 टन, चीन 1.9 टन, युरोपीय महासंघ 1.8 टन आणि भारत केवळ अर्धा टन नोंदले गेले. संयुक्त राष्ट्रसंघाने असे उघड केले आहे की, गेल्या वर्षी जगभरातील देशांनी 59 टक्के कार्बन उत्सर्जन केले असून त्यात चीन 28 टक्के, अमेरिका 15 टक्के, युरोपीय महासंघ 9 टक्के आणि भारत 7 टक्के अनुक्रमे होते. पॅरिस करारातून अमेरिकेने महिन्याभरापूर्वी अधिकृतपणे अंग काढून घेतले असल्यामुळे भारत आणि चीनवर नैसर्गिकपणेच कार्बन उत्सर्जनासाठी स्वयंनियमनाची उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी दबाव वाढला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.