वॉशिंग्टन डी.सी - अमेरिका राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातच ट्रम्प यांनी एक व्हिडीओ जारी केला. 'आता मला आधीपेक्षा बरे वाटत आहे. येथील डॉक्टर, नर्सेस मेहनत घेत आहेत. अमेरिकेसाठी जे अभियान मी सुरू केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी तत्पर आहे. येते काही दिवस खरी परीक्षा पाहणारे असतील, असे ट्रम्प यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच, यावेळी त्यांनी डॉक्टर, नर्सेस आणि नागरिकांचे आभार मानले.
- — Donald J. Trump (@realDonaldTrump) October 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 3, 2020
">— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 3, 2020
अमेरिका जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली देश आहे. अमेरिकेला आणखी चांगले बनवायचे आहे. या संकटात मला एका ठिकाणी बसून चालणार नाही. एक नेता म्हणून मी सर्व समस्यांचा सामना करायलाच हवा, असे अध्यक्ष म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टनमधील मुख्य सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते आता या दवाखान्यात राहून त्यांचे कामकाज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला आहे. कोरोनामुळे त्यांच्या आगामी प्रचार नियोजन तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ३ नोव्हेंबरला होत आहे. मात्र, ट्रम्प यांना कोरोना झाल्याने प्रचार दौऱ्यांवर बंधने आली आहेत.