ETV Bharat / international

प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या पुरुषांना दिलासा; नवीन संशोधनामुळे केमोथेरपी पासून सुटका - अमेरिकेत प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार शक्य

पुरुषांमध्ये दिवसेंदिवस प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आता अमेरिकेत केलेल्या संशोधनामध्ये प्रोस्टेट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या  पुरुषांचे आयुष्य  रोगप्रतिकारक चिकित्सेमुळे दोन किंवा त्याहून जास्त वर्षे वाढू शकते, हे सिद्ध झाले आहे.

prostet cancer
प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या पुरुषांना दिलासा; नवीन संशोधनामुळे केमोथेरपी पासून सुटका
author img

By

Published : Nov 30, 2019, 11:29 PM IST

वॉशिंग्टन डी.सी. - पुरुषांमध्ये दिवसेंदिवस प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आता अमेरिकेत केलेल्या संशोधनामध्ये प्रोस्टेट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या पुरुषांचे आयुष्य रोगप्रतिकारक चिकत्सेमुळे दोन किंवा त्याहून जास्त वर्षे वाढू शकते, हे सिद्ध झाले आहे.

कॅन्सरवरील उपचारांशी आधारित आभ्यासक्रमात संबंधित बाब पुढे आली असून आता कॅन्सरच्या वेदनादायक उपचारांनी त्रस्त झालेल्या पुरुषांना यापासून सुटका मिळण्याचे संकेत आहेत. रोगप्रतिकारक चिकित्सा अभ्यासक्रमात प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार पद्धती असल्याचे संशोधनात समोर आले आहे.

या संशोधनासाठी घेण्यात आलेल्या ट्रायलमध्ये काही पुरुषांवर प्रयोग करण्यात आले. प्रयोगात समाविष्ट असलेल्या पुरुषांमधील काहींनी लगेच सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा सामान करण्यासाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच संबंधित ट्रायलनंतर या रुग्णांमधील प्रतिकारशक्ती आश्चर्यकारकरीत्या वाढल्याचे संशोधकांना लक्षात आले.

इन्स्टिट्युट ऑफ कॅन्सर रिसर्च, लंडन आणि रॉलय मारस्डेन फाऊंडेशन या संस्थांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनात 258 पुरुषांवर टेस्ट करण्यात आली. कॅन्सरने त्रस्त असलेल्या व याआधी केमोथेरपी सारख्या अन्य ट्रिटमेंट घेतलेल्या रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. यामधील सर्व पुरुष प्रोस्टेट कॅन्सरच्या अंतिम टप्प्यात होते.

प्रयोगादरम्यान काही पुरुषांनी थेरपीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे पुरुषांना संपूर्ण फायदा झाला नसला तरीही, काहींचे आयुष्य वाढल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वात आश्चर्यकारक प्रतिसाद ट्युमर असलेल्या व्यक्तींकडून आला आहे. या व्यक्तींच्या ट्युमरमधील डीएनएच्या जनुकांमध्ये बदल घडून आल्याने शास्त्रज्ञांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या शास्त्रज्ञ या जनुकांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी संशोधन करत आहेत. यामधील पाच टक्के लोकांना पेम्ब्रोलायझोमॅब नामक ड्रग दिल्याने त्यांच्या शरीरातील ट्युमरचा आकार कमी झाल्याचे निदर्शनास आले.

यावर संशोधन करणाऱया प्राध्यापक जोआन दे बोनो यांच्या माहितीनुसार, अंतिम टप्प्यात प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या काही पुरुषांनी रोगप्रतिकारक चिकत्सेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समोर आले. यामुळे संबंधित व्यक्तींचे आयुष्य दोन वर्षांहून जास्त वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

https://www.aninews.in/news/health/men-with-prostate-cancer-can-live-longer-on-immunotherapy-study-finds20191130191146/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.