वाशिंगटन - युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, भारतातील सर्वात मोठी रिफायनरी इंडियन ऑइल कॉर्पने 24 फेब्रुवारी रोजी रशियाकडून 3 दशलक्ष बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. यानंतर कच्च्या तेलाच्या या खरेदी प्रस्तावावर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी म्हणाल्या की, भारताने रशियाकडून सवलतीच्या दराने तेल खरेदी करून अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केले नाही. पण अशा हालचालीने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला 'इतिहास चुकीच्या बाजूने' ठेवेल.
दरम्यान, अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने रशियाकडून ऊर्जा आयातीवर बंदी घातली आहे. कच्च्या तेलासह इतर वस्तू अनुदानित किमतीत विकत घेण्याच्या भारताच्या ऑफरचा विचार केल्यावर जेन साकी यांनी सांगितले की, जो बायडेन प्रशासनाचा संदेश देशांनी आमच्या नियमांचे पालन करावे.
भारताने शक्य तितके रशियापासून दूर राहावे -
जेन साकी म्हणाल्या की, मला नाही वाटत हे या नियमांचे उल्लंघन असेल. मात्र, तुम्हाला कुठे उभे रहायचे आहे याचा देखील विचार करा. जेव्हा या वेळी इतिहासाची पुस्तके लिहिले जात आहे, रशियन नेतृत्वाचे समर्थन म्हणजे विनाशकारी प्रभावांच्या आक्रमणाचे समर्थन आहे. भारताने अद्याप रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध केलेला नाही आणि संयुक्त राष्ट्रात रशियाच्या विरोधात मतदान करणे टाळले आहे. अलिकडच्या आठवड्यात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, भारताने शक्य तितके रशियापासून दूर राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. तसेच शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा ते क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांपर्यंत सर्व गोष्टींसाठी मॉस्कोवरील त्याचे प्रचंड अवलंबित्व कमी करायला हवे.
मागच्या आठवड्यात रशियाचे उपपंतप्रधान अलेक्जेंडर नोव्हाक यांनी भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्याशी फोन करुन संवाद साधला. यावेळी त्यांनी देश रशियन तेल क्षेत्रातील भारतीय गुंतवणुकीसह भारतातील तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात वाढविण्यास उत्सुक आहे, असे सांगितले.
गेल्या आठवड्यात मॉस्कोमध्ये जारी केलेल्या रशियन सरकारच्या प्रकाशनात म्हटले की, रशियाची भारतातील तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात एक बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे आणि हा आकडा वाढवण्याची स्पष्ट संधी आहे. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक म्हणाले की, रशिया शांततापूर्ण अणुऊर्जेच्या विकासासाठी, विशेषत: कुडनकुलममधील अणुऊर्जा युनिट्सच्या उभारणीत सतत सहकार्य करण्यास उत्सुक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील सर्वात मोठ्या रिफायनर इंडियन ऑइल कॉर्पने रशियाकडून 3 दशलक्ष बॅरल कच्चे तेल विकत घेतले आहे. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अशा प्रकारचा हा पहिलाच व्यवहार आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे. भारत सध्या 80 टक्के तेल आयात करतो, परंतु त्यापैकी केवळ 2 ते 3 टक्के खरेदी रशियाकडून होते.