ETV Bharat / international

वायू प्रदूषण घटल्यास शरीरावर होणार चमत्कारिक परिणाम

author img

By

Published : Dec 15, 2019, 11:53 AM IST

वायू प्रदूषण कमी केल्यास प्रकृती चांगली राहात असून शरीराची रोग प्रतिरोधक क्षमताही वाढत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सरकारांनी 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन' च्या पर्यावरण संरक्षण विषयक मार्गदर्शक सुचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सदर विषयावर लिखाण करणाऱ्या आघाडीच्या लेखिका डॉ. डीन श्रौफनेगल यांनी सांगितले आहे.

वॉशिंग्टन
वायू प्रदुषण घटल्यास शरिरावर होणार चमत्कारिक परिणाम

वॉशिंग्टन (यू.एस.ए)- वायू प्रदूषण घटल्यास शरीरावार त्याचे चमत्कारिक परिणाम होतात, असे एका आभ्यासातून समोर आले आहे. 'एन्व्हायरोमेंटल कमेटी ऑफ दी फॉरम ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटी' ने 'हेल्थ बेनेफिट ऑफ एअर रिडक्शन' या विषयावर अभ्यास केला होता. या अभ्यासावरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

सदर विषयावर 'थोरासिस सोसायटी जर्नल' या मासिकेत माहिती छापून आली आहे. आम्ही केलेल्या अभ्यासातून आम्हाला अभूतपूर्व परिणाम मिळालेले आहेत. वायू प्रदूषण कमी केल्यास प्रकृती चांगली राहात असून शरीराची रोग प्रतिरोधक क्षमताही वाढत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सरकारांनी 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन' च्या पर्यावरण संरक्षण विषयक मार्गदर्शक सुचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सदर विषयावर लिखाण करणाऱ्या आघाडीच्या लेखिका डॉ. डीन श्रौफनेगल यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर, नाईजेरीयात ज्या घरी प्रदूषणरहित शेगड्यांचा वापर होतो. त्या घरांमधील गर्भवती स्त्रियांना निरोगी व सुदृढ बाळ जन्माला आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, वाहतूक नियंत्रणामुळे देखील वायू प्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. जर पर्यावरण संरक्षणाबाबतच्या धोरणाची काटेकोरपणे अमलबजावणी केली तर काही हफ्त्यातच मृत्यू दरात घट होऊ शकते, असे डॉ. डीन श्रौफनेगल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- फारूख अब्दुल्ला यांची नजरकैद तीन महिन्यांनी वाढवली

Intro:Body:

https://www.aninews.in/news/lifestyle/quirky/reduction-in-air-pollution-brings-dramatic-health-benefits-study20191214233537/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.