न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी कॅरेबियन समुहातील देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. कॅरेबियन देश आणि भारतामध्ये 'कॅरिकॉम समिट' चे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. जागतिक वातावरण बदलाशी लढा आणि कॅरेबियन देशांशी संबध वृद्धींगत करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
-
USA: Prime Minister Narendra Modi attends the India-CARICOM (Caribbean Community and Common Market) leaders' meeting in New York. pic.twitter.com/G8bzSMDyQI
— ANI (@ANI) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">USA: Prime Minister Narendra Modi attends the India-CARICOM (Caribbean Community and Common Market) leaders' meeting in New York. pic.twitter.com/G8bzSMDyQI
— ANI (@ANI) September 25, 2019USA: Prime Minister Narendra Modi attends the India-CARICOM (Caribbean Community and Common Market) leaders' meeting in New York. pic.twitter.com/G8bzSMDyQI
— ANI (@ANI) September 25, 2019
संयुक्त राष्ट्र्राच्या ७४ व्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात आली. वातावरण बदलाशी लढा कसा द्यायचा याविषयी परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच कॅरेबियन देशांशी भारताचे संबध सुधारण्यासाठी चर्चा झाली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी आणि कॅरेबियन समुहातील देशांच्या प्रमुखांबरोबरचा एक फोटो ट्विट केला आहे. दोन्ही देशांमधील संबध वृद्धींगत होण्यासाठी पंतप्रधान मोदी कॅरेबियन समुहातील देशांच्या नेत्यांशी बैठक घेत आहेत. यामध्ये १४ देशांचे प्रमुख सहभागी झाले आहेत, असे ट्विट रवीश कुमार यांनी केले आहे.
अँटिग्वा, बारबुडा, बहामास, बारबाडोस, बेलिझ, डॉमॅनिका, ग्रेनेडा, ग्युयाना, हैती, जमैका, सेंट किट्स अॅड नेव्हिस, सेंट लुशिया, सेंट व्हिन्सेंट, ग्रेनेडियंन्स, सुरिनेम, ट्रिनिदाद आणि टोबॅगो देशांचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
: