वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या आठवड्यात अमेरिकेत १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले ( 1 Lakh Covid Cases USA In Week ) आहेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे यामधील ९५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे ( Omicron In United States ) होते.
डेल्टाचे रुग्ण कमी, ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले
मंगळवारी उशिरा जाहीर झालेल्या नवीन केंद्रीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या ( Centres For Disease Control and Prevention ) अंदाजानुसार, डेल्टा ते ओमायक्रॉन यामध्ये महिनाभरात बराच फरक झाला. नोव्हेंबरच्या अखेरीस, देशातील 99.5 टक्क्यांहून अधिक कोरोनाव्हायरस रुग्णांना संक्रमण हे डेल्टा व्हायरसचे होते. सोमवारी अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. गेल्या आठवड्यात 1 लाख 3 हजार पेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांना कोविडची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेव्हा कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्रकाराने देशभरात अनेकांना लागण झाली त्यानंतर गेल्या आठवड्यात आढळलेली कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत २७ टक्के वाढ
गेल्या आठवड्यात युनायटेड स्टेट्समध्ये कोविडमुळे रूग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात 27 टक्के वाढ झाल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. कोविडमुळे होणारे सरासरी दैनंदिन मृत्यू 8 टक्क्यांनी घटले आहेत, असा अहवाल सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिला आहे.
गेल्या वर्षी सर्वाधिक रुग्ण
गेल्या वर्षी 14 जानेवारी 2021 ला सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळून आले होते. त्यावेळी १ लाख ४२ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. आतापर्यंत, जगातील सर्वाधिक कोरोना बाधित प्रकरणे आणि मृत्यूसह अमेरिका हा साथीच्या रोगाने सर्वात जास्त प्रभावित देश राहिला आहे. कमी लसीकरण दर असल्याने अमेरिकेत ओमायक्रॉनचा प्रसार होण्यासाठी वातावरण निर्माण झाले आहे. असेही अहवालात म्हटले आहे.