वॉशिंग्टन - मंगळ ग्रहावर 8 वेळा यशस्वी यान उतरविल्यानंतर नासाने पर्सविअरन्स हे रोवर फ्लोरिडामधील प्रेक्षपणस्थळावरून झेपावले आहे. मंगळ ग्रहावर अस्तित्वात असलेल्या भूतकाळातील जीवनाविषयी हे रोव्हर माहिती गोळा करणार आहे.
नासाचे रोव्हर हे चीनच्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या रोव्हरच्या कक्षेत जाणार आहे. हे दोन्ही रोव्हर गेल्या आठवड्यात लाँच झाले होते. त्यामुळे अमेरिकेची चीनबरोबर अवकाशातही स्पर्धा होणार आहे.
रोवरला मंगळावर पोहोचण्यासाठी सात महिन्यात 300 दशलक्ष मैलांचे अंतर पार करावे लागणार आहे. जमिनीवर पोहोचताच यानाकडून भूतकाळातील सूक्ष्मजीवनाची माहिती गोळा करण्यात येणार आहे. मंगळवरील जीवनाविषयी नासाकडून शोध घेण्यात येत आहे. या उन्हाळ्यातील शेवटची आणि मंगळावरील नासाची शेवटची मोहीम आहे.