ETV Bharat / international

मॅक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची बाधा - मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मैन्युल लोपेज ओब्राडेर

मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मैन्युल लोपेज ओब्राडेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असून डॉक्टरांच्या निगरानीखाली असल्याचे त्यांनी टि्वट करून सांगितले.

मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
आंद्रे मैन्युल लोपेज ओब्राडेर
author img

By

Published : Jan 25, 2021, 2:07 PM IST

मेक्सिको सिटी - जगभरामध्ये कोरोना विषाणुचा प्रसार झाला आहे. कोरोनाची अनेक नेत्यांना लागण झाली आहे. मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मैन्युल लोपेज ओब्राडेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे असून मी डॉक्टरांच्या निगरानीखाली आहे, असे त्यांनी टि्वट केले आहे.

मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगताना, अत्यंत दु:ख होतं आहे. माझ्यात कोरोनाची सूक्ष्म लक्षणं दिसत आहेत. मी डॉक्टरांच्या निगरानीखाली आहे. तसेच नेहमीप्रमाणे या परिस्थितीमध्येही मी आशावादी आहे, असे ते टि्वटमध्ये म्हणाले. तसेच माझे घडामोडींवर लक्ष आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधणार आहे. रशियाकडून कोरोना लस खरेदीसाठी पुतीन यांच्याशी महत्वाची चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मेक्सिकोमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. मॅक्सिकोत कोरोना रुग्णांची संख्या 17 लाख 52 हजार 347 आहे. तर आतापर्यंत 1 लाख 49 हजार 614 जणांचा बळी गेला आहे.

बड्या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण -

अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, प्रिन्स चार्ल्स, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो, रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन, अमेरिका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.