ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संसदेत महाभियोगाची 'संक्रात' - डोनाल्ड ट्रम्प न्यूज

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल इमारतीवर नुकतेच हल्लाबोल केला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Jan 14, 2021, 3:17 AM IST

Updated : Jan 14, 2021, 3:55 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेवर समर्थकांनी केलेला हल्ला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच भोवला आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग मंजूर करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये संसदेच्या प्रतिनिधींनी महाभियोग मंजूर करण्यासाठी बहुमत दिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या अध्यक्षांवर दुसऱ्यांदा महाभियोग संसदेच्या सभागृहात चालविण्यात आला. संसदेमध्ये महाभियोगाच्या प्रस्तावार चर्चा करण्यात आली. यावेळी २३२ विरोधात १९७ जणांनी महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे ट्रम्प यांचा पक्ष असलेल्या रिपब्लिकनच्या १० लोकप्रतिनिधींनीही महाभियोग मंजूर करण्याच्या बाजूने मत दिले. सिनेटमध्ये १९ जानेवारीला महाभियोगाच्या प्रस्तावावर मतदान घेतले जाणार आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल इमारतीवर नुकतेच हल्लाबोल केला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. डेमॉक्रॅटीक पक्षाने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला चालविण्याासाठी प्रस्ताव आणला होता. सशस्त्र हिंसाचार घडवून आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा-US Capitol clash : चार आंदोलकांचा मृत्यू तर ५० जण ताब्यात

अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीनुसार उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी एक आदेश जारी करावा. त्यानुसार ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी राहण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट करावे. त्यानंतर महाभियोग चालविण्यात येईल. मात्र, डेमॉक्रॅटिक पक्षाच्या या मागणीला रिपब्लिकन पक्षाने नकार दिला आहे. आधी महाभियोगावर संसदेत चर्चा व्हावी, असे काही नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनीही ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवावा असे म्हटले होते.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला होता. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षावर दोनदा महाभियोगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रतिनिधींच्या सभागृहाने जरी ट्रम्प यांच्या विरोधात मत दिले असले, तरी 'सिनेट'मध्येही महाभियोगाची पुढील प्रक्रिया होणार आहे. सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला बहुमत मिळाल्यास ट्रम्प यांच्यावरील महाभियोग मंजूर होणार आहे.

Last Updated : Jan 14, 2021, 3:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.