लंडन : आपली कोरोना लस ही ९६ टक्के परिणामकारक असल्याचा दावा अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स इनकॉर्पोरेटेड या कंपनीने केला आहे. यासोबतच, ही लस कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनविरोधात ८९ टक्के परिणामकारक असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
जगभरात सध्या विविध लसींचा उपयोग करुन कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाविरुद्ध १०० टक्के परिणामकारक अशी कोणतीही लस अद्याप समोर आली आहे. तसेच, इतर लसींचे संशोधन सुरू असतानाच कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आल्यामुळे, या लसी नव्या स्ट्रेनविरोधात कितपत फायदेशीर ठरतील हे निश्चित नाही.
यामध्येच नोव्हाव्हॅक्सचा दावा समाधानकारक असला, तरी हा दावा त्यांनी आपल्या लसीच्या चाचणीच्या पहिल्याच टप्प्यानंतर केला आहे. सध्या या लसीची ब्रिटनमध्ये १५ हजार लोकांवर चाचणी सुरू आहे.
हेही वाचा : गेल्या वर्षभरात दारुच्या दुकांनाचा शोध अधिक; गुगलकडून यादी प्रसिद्ध