वॉशिंग्टन - निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने पराभूत केल्यानंतर जो बिडेन नव्हे तर कमला हॅरीस या देशाच्या अध्यक्ष होतील, असा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या बिडेनच्या मानसिक क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ट्रम्प हे ओशकोशमधील निवडणूक प्रचार कार्यक्रमात बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या जो बिडेन यांच्या मानसिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, की वेड्या सामाजिक धोरणांतून देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त व्हावी, असे तुम्हाला वाटते का? जो बिडने आणि कमला हॅरीस हे झोपाळू आहेत.
निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर बिडेन हे जानेवारी 2021 मध्ये 78 वर्षांचे होणार आहेत. ते अध्यक्षपद स्वीकारणारे सर्वात वृद्ध ठरणार आहेत. तर हॅरीस या 56 वर्षांच्या होणार आहेत. बिडने आणि हॅरीस हे विजयी झाले तर चीन अमेरिकेवर विजय मिळविणार असल्याचा दावा ट्म्प यांनी बिडेन यांच्या मुलाचा चिनी कंपन्यांबरोबर व्यवसाय असल्याचाही ट्रम्प यांनी आरोप केला आहे.
दरम्यान, कमला हॅरीस या मूळ भारतीय वंशाच्या असून त्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत.