ETV Bharat / international

प्रियकर की राक्षस? प्रेयसीची हत्या करत शरीराचे तुकडे खाल्ले! - प्रेयसीची हत्या अमेरिका

प्रेयसीची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अमेरिकेतील जेफरसनविले येथे हा प्रकार घडला होता.

girlfriend murder
प्रेयसीची हत्या (प्रतिकात्मक)
author img

By

Published : Oct 14, 2020, 10:27 AM IST

Updated : Oct 14, 2020, 10:44 AM IST

जेफरसनविले (यूएसए) - दक्षिण इंडियाना प्रांतातील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीची हत्या करत तिच्या शरीराचे काही भाग खाल्ल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले. त्याला मंगळवारी पॅरोलविना तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जोसेफ ओबरहांसले असे या आरोपीचे नाव आहे.

ओबरहॅन्स्ले 18 सप्टेंबर रोजी टॅमी जो ब्लांटनच्या मृत्यूप्रकरणी खून आणि घरफोडीच्या आरोपात दोषी ठरला. क्लार्क सर्किट न्यायाधीश विक्की कार्मिकल यांनी ज्युरीच्या शिफारसीच्या आधारे ओबरहॅन्स्लेला शिक्षा सुनावली.
46 वर्षीय ब्लांटनचा मृतदेह 14 सप्टेंबर 2014ला सकाळी तिच्या घरी आढळला. या मृतदेहावर 25पेक्षा जास्त तीक्ष्ण वार करत मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

त्या दिवशी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जेव्हा दोन तरूण पीडितेच्या घरी आले होते. ओबरहॅन्स्लेने साक्ष दिली, की ब्लांटनच्या मृत्यूसाठी तेच जबाबदार आहेत. पोलिसांनी पीडितेच्या शोधात दार ठोठावले तेव्हा तो जागा झाला. घरफोडीच्या आरोपात ओबरहॅन्स्ले यांना एकाच वेळी सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती, याबाबत द न्यूज आणि ट्रिब्यूनने वृत्त दिले.

सरकारी वकिलांनी गेल्या वर्षी फाशीची शिक्षा मिळविण्याचा प्रयत्न सोडला होता.

Last Updated : Oct 14, 2020, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.