वॉशिंग्टन : भारतीय अमेरिकन समाज कोरोना विषाणुच्या महामारीच्या आव्हानाचा मुकाबला करण्यास सज्ज झाला असून महामारीने अमेरिकेला असाधारण पद्धतीने आपल्या विळख्यात घेतले आहे. भारतीय अमेरिकन्स स्थानिक समुदायांना आणि घरी जाण्यास विमाने नसल्याने अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना मदतीचा हात देत आहेत. भारतीय अमेरिकन डॉक्टर्स आणि हॉटेलचालकांनी विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि खोल्या देऊन पुढे सरसावले आहेत. समुदायाच्या नेत्यांनी काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दाराशी किराणा सामानाच्या पिशव्या टाकल्या असून संकटात सापडलेल्यांना आपल्या घरात त्यांनी आसरा दिला आहे.
अमेरिकेला कोरोना विषाणुचा सर्वाधिक तडाखा बसला असल्याच्या बातम्या भारतातील पालक आणि नातेवाईक पहात असले तरीही त्यांनी धीर धरला पाहिजे. सर्व ५० अमेरिकन राज्यांना तडाखा बसला असून न्यूयॉर्क केंद्रबिंदू आहे. अमेरिकेत आतापर्यंत २१६७६८ रूग्ण असून ५१३७ मृत्युंची नोंद झाली आहेत. हे आकडे गंभीर आहेत, यात काही शंका नाही. हजारो मैल दूर असलेल्या कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटणार, हे समजण्यासारखे आहे. पण विविध संस्था असाधारण स्थितीला प्रतिसाद देताना आपले नियम एका रात्रीतून बदलून पुढे सरसावत आहेत. अनेक जण त्यांना मायदेशी परत आणण्याबाबत सांगत आहेत,त्याला पुरवठा साखळी आणि आरोग्य मार्गदर्शक तत्वे परवानगी देत नाहीत. कोरोना विषाणु काही विशिष्ट नागरिकांना विशेष व्यवस्था करण्याची परवानगी देत नाही.
शेवटी, अफवांवर आणि व्हॉट्सअप संदेशांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आणि अमेरिकन सरकारच्या वेबसाईटवर दिल्या जाणार्या ताज्या सूचनांचे पालन करणे हाच सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. खरेतर, अफवांमुळे केवळ भारतीय नागरिकांना मदत करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त डोकेदुखी निर्माण होत आहे. त्यांच्याकडे मर्यादित साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ आहे. केवळ ट्विटर अकाऊंट खोलून केवळ लक्ष वेधण्यासाठी तक्रार करणे हे काही उपयुक्त होणार नाही. कुणाचा तरी मुलगा किंवा मुलीला विमानाने मायदेशी पाठवले पाहिजे, अशी मागणी करणारे पत्र मतदारांच्या वतीने राजकारण्यांकडून पत्र लिहून बोजा वाढवणे हे ही उपयुक्त नाही. हे विशेषतः भारतीय विस्थापित कामगार जे शेकडो किलोमीटर पायपीट करत आहेत, कारण त्यांची ट्विटर अकाऊंट्स नाहीत, याविरोधात हे अत्यंत वाईट आहे.
एअर इंडिया अमेरिकन नागरिकांना मायदेशी परत पाठवत आहेत आणि भारतीय नागरिकांना त्याच परतीच्या उड्डाणाने मायदेशी परत घेऊन जात आहेत, हे खरे नाही. ही सध्या व्हॉट्सअपवर चालणारी अफवा आहे. अमेरिकन दूतावास आपल्या स्वतःच्या स्त्रोतांना अगोदर व्यवस्थित करत असून अमेरिकन विमाने भारतातून परत आणत आहेत. डेल्टा एअरलाईन्सचा वापर ते करत असून एअर इंडिया नाही. व्हॉट्सअप संदेशांवर आधारित चुकीची माहिती आणि विनंत्या यामुळे केवळ संभ्रमात भर पडत आहे. अधिकारी सांगतात की, वस्तुस्थितीला चिकटून राहणे हेच सर्वोत्कृष्ट राहिल. सध्या तुम्ही जेथे आहात तेथेच आसरा घेऊन रहा, हाच सर्वोत्कृष्ट सल्ला राहिल. भारतीय दूतावास कमी कर्मचार्यांसह काम करत असून पुरेशी खबरदारी घेतली जात आहे. कार्यालयात केवळ एक तृतियांश अधिकारी येत असून उरलेले सामाजिक अंतर राखत घरून काम करत आहेत. कुणाही व्यक्तिला अनावश्यक धोका टाळण्यासाठी हा निर्णय आहे.
दूतावास आणि पाच वकिलाती तणावाखाली असून उभरत्या परिस्थितीशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मदत मागणार्या भारतीयांच्या आणि अमेरिकन सरकारच्या विविध एजन्सीजच्या संपर्कात ते आहेत. मात्र अमेरिकन एजन्सीज स्वतःच प्रचंड तणावाखाली आहेत. अमेरिकन सरकारचा परराष्ट्र विभाग, गृहभूमी सुरक्षा विभाग आणि अमेरिकन नागरिकत्व कायमच्या वास्तव्यासाठी परदेशातून येणे सेवा या संबंधित विभागांनी भारतीय दूतावासाला भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव असल्याचे आश्वासन दिले आहे. या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या भेटीला आलेल्या कुटुंबियाच्या एच-१बी व्हिसाची मुदत संपत आहे.
इतर सर्व राष्ट्रांच्या नागरिकांची हीच परिस्थिती आहे. यूएसजीआयसी महामारीमुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून ज्या लोकांच्या व्हिसाची मुदत संपत आली आहे किंवा मुदतवाढ देण्यास परवानगी नाही, त्यांच्याबाबत दयाळुपणाची भूमिका घेण्याची अपेक्षा आहे. भारतीय नागरिक अजूनही नवा विक्रम करण्यासाठी व्हिसाच्या मुदतवाढीसाठी ऑनलाईन अर्ज करतच आहेत. अनेक अमेरिकन विद्यापीठांनी किमान एक तरी वसतीगृह उघडे ठेवले असून अनेक भारतीय विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्ये रहात आहेत. ही वेळ पहाता असामान्य अशी ही सवलत आहे कारण याचा अर्थ देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यासाठी यावेच लागणार आहे. काही विद्यापीठांनी परदेशी विद्यार्थ्यांना लहानसे विद्यावेतन दिले आहे कारण खर्च वाचवण्यासाठी कँपसमध्ये काम करणे हा काही आता पर्याय राहिलेला नाही.
अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी भारताने आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्याच्या अगोदर सुरूवातीच्या टप्प्यातच अमेरिका सोडली. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या ओजीआय कार्डधारकांबाबत दूतावास अधिकाऱ्यांनी संपूर्ण नवीन प्रक्रिया तयार केली आहे. संभ्रमामुळे अनेक जण दुबई आणि अबुधाबीत अडकले आहेत कारण परदेशी विमानसेवांमध्ये भारताच्या विमानसेवा बंद करण्याच्या कट ऑफ वेळेबाबत संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी प्रवाशांना विमानात घेण्यास नकार दिला. २ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी सध्या विविध अमेरिकन विद्यापीठांमध्ये नावनोंदणी केली आहे आणि त्यापैकी बहुतेक तेथेच राहिले आहेत. कोरोना विषाणुचा उद्रेक सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच भारतीय दूतावासाने तयार केलेली चोविस तास चालणारी हेल्पलाईन कार्यरत झाली. पहिल्या आठवड्यातच, प्रशिक्षित विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहकारी विद्यार्थ्यांकड़ून आलेले २०० कॉल्स टाकले, त्यापैकी ७५ टक्के कॉल मायदेशी परत नेण्याच्या व्यवस्थेबद्दल आणि व्हिसाच्या मुद्यावर होते.
अधिकारी सांगतात की, स्टुडंट्स हब कँपसमधून मिळालेली माहिती, ४५ विद्यार्थी राजदूत आणि विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावास ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना ताजी माहिती देण्यासाठी पोहचला असून अधिक महत्वाचे म्हणजे या अवघड काळात त्यांना नैतिक धैर्य देत आहे. विद्यार्थी स्वयंसेवकांनी व्हिसाबाबतच्या तसेच जे तात्पुरता व्हिसा असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या पर्यायी प्रॅक्टिकल प्रशिक्षणाची परवानगी दिली आहे त्याबाबत आणि इतर प्रश्नांना उत्तरे दिली. स्वयंसेवकांचीही तीच परिस्थिती असल्याने उत्तरेही तशीच प्रतिसादात्मक आहेत, असे अधिकारी म्हणाले. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिनच्या डॉक्टरानी अमेरिकेत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना तेवढ्या कालावधीसाठी विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि मदत देऊ केली आहे. तसेच ज्यांची औषधे संपत आली आहे त्यांनाही औषधे पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.
एशियन अमेरिकन हॉटेल ओनर्स असोसिएशनचे हॉटेलचालक भारतीय विद्यार्थ्यांना ज्यांचे कँपस अगोदरच बंद झाले आहेत त्यांना खोल्या विनामूल्य देत आहेत. काही जण त्यांना जेवणही पुरवत आहेत. संपूर्ण जगाला वेढून टाकणाऱ्या या संकटात अमेरिका आणि भारतासह, प्रत्येकाने पुढे सरसावून आपली भूमिका बजावली पाहिजे. हीच यातील मूळ संकल्पना आहे.
- सीमा सिरोही (लेखिका अमेरिका स्थित पत्रकार आहेत.)