वॉशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. एकूण जगभरातील कोरोना रुग्णांनी 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांमध्ये जगात 3 लाख 46 हजार 80 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 8 हजार 651 जणांचा बळी गेला आहे.
अद्ययावत आकडेवारीनुसार, जगभरात एकूण 3 कोटी 60 लाख 44 हजार 735 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 10 लाख 54 हजार 604 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 2 कोटी 71 लाख 48 हजार 967 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
चीनच्या वूहानमधून पसरलेल्या कोरोनाविषाणूचा विळखा घट्ट झाला आहे. जगात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या तर, भारत दुसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम झाला असून आर्थिक पुनर्प्राप्ती कठीण झाली आहे. तसेच कोणत्या औषधाने कोरोना रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित होईल आणि सुरक्षा मिळेल हे अजून संशोधनात निश्चित झालेले नाही. त्यामुळे योग्य लस उपलब्ध होईपर्यंत ‘सर्वांसाठी एक समान’ धोरण आणि नियमावली आखून जागरूकतेने सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.