वाशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जगात तब्बल 3 हजार 705 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 52 हजार 203 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण आढळले.
जगभरामध्ये 3 कोटी 33 लाख 10 हजार 953 कोरोनाबाधित आढळले असून 10 लाख 2 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 कोटी 46 लाख 39 हजार 64 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
अमेरिकेमध्ये 73 लाख 21 हजार 343 कोरोना रुग्ण आढळले, तर 2 लाख 9 हजार 453 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात 60 लाख 74 हजार कोरोना रुग्ण आढळले असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ ब्राझिल, रशिया आणि कोलबिंयामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.