ETV Bharat / international

जगभरात 1 कोटी 13 लाख 71 हजार कोरोनाग्रस्त; 5 लाख 32 हजार बळी

author img

By

Published : Jul 5, 2020, 11:05 AM IST

गेल्या 24 तासांत जगभरामध्ये 1 लाख 89 हजार 828 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 478 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा 5 लाख 32 हजार 856 वर पोहचला आहे. तर एकूण 1 कोटी 13 लाख 71 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 64 लाख 32 हजार 994 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये 1 लाख 89 हजार 828 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 478 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा 5 लाख 32 हजार 856 वर पोहचला आहे. तर एकूण 1 कोटी 13 लाख 71 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 64 लाख 32 हजार 994 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाचा फटका अमेरिकेला सर्वांत जास्त बसला असून इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेतील मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेत 29 लाख 35 हजार 427 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 32 हजार 313 जणांचा बळी गेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 64 हजार 365 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 लाख 78 हजार 376 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापाठोपाठ रशिया, भारत, पेरू, स्पेनमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कोरोना विषाणूची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरला. चीनमध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला. चीनमध्ये फक्त नवे 8 कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंत 83 हजार 553 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 हजार 634 मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.