वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण ( Barack Obama Tests Positive For Covid ) झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ( PM Modi tweet about Obama ) दिल्या आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ( former US President Obama ) यांनी रविवारी ट्विट केले की, गेल्या दोन दिवसांपासून माझा घसा दुखत आहे. पण, आता मला बरे वाटत आहे. पत्नी मिशेलला कोरोनाची लागण झालेली नाही. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, बराक ओबामा, मी तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हावे होण्याच्या शुभेच्छा देत आहे. तुमच्या कुटुंबाला चांगले आरोग्य मिळावे, अशा शुभेच्छा ( PM wishes to Barack Obama ) आहेत.
-
My best wishes @BarackObama for your quick recovery from COVID-19, and for your family's good health and wellbeing. https://t.co/mCrUvXlsAp
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My best wishes @BarackObama for your quick recovery from COVID-19, and for your family's good health and wellbeing. https://t.co/mCrUvXlsAp
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2022My best wishes @BarackObama for your quick recovery from COVID-19, and for your family's good health and wellbeing. https://t.co/mCrUvXlsAp
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2022
हेही वाचा-धक्कादायक : तीन वर्षीय मुलाने चुकुन आईवर झाडली गोळी.
अमेरिकेमधील सुमारे 75.2 टक्के प्रौढांचे पूर्णपणे लसीकरण
अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी ( Corona cases in USA ) झाले आहे. अशा परिस्थितीतही अमेरिकन लोकांना कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण करण्यासाठी बराक ओबामा यांनी प्रोत्साहित केले. अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात सुमारे 35,000 लोकांना संसर्ग झाला आहे. तर जानेवारीच्या मध्यात सुमारे आठ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होता. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या माहितीनुसार अमेरिकेमधील सुमारे 75.2 टक्के प्रौढांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर 47.7 टक्के लोकांनी बूस्टर डोसदेखील घेतला आहे.