ETV Bharat / international

अमेरिकेत कोरोनाचे थैमान, गेल्या २४ तासात २२२८ नागरिकांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 2 हजार 228 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे. तर बाधितांची एकूण संख्या 6 लाख 2 बदाप 989 वर पोहचली आहे.

#coronavirus
#coronavirus
author img

By

Published : Apr 15, 2020, 9:26 AM IST

वॉशिंग्टन डीसी - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये पसरला आहे. अमेरिकामध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 2 हजार 228 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये आतापर्यंत 25 हजार 575 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांची संख्या 6 लाख 2 बदाप 989 वर पोहोचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 46 हजार 515 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. न्युयॉर्क आणि न्युजर्सीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आणि देणगीदार कोरोनाची लागण झाल्यानंतर कोमामध्ये होते, त्यांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कच्या रिअल इस्टेट उद्योगाचे व्यापारी स्टेनली चेरा यांचा शनिवारी मृत्यू झाला. रविवारी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने चेरा यांची ओळख आणि राष्ट्रपतींशी असलेले संबंध याची माहिती दिली. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ट्रम्प यांच्या वैयक्तिक मैत्रीविषयी माहिती दिली.

अमेरिकेकडे सामर्थ्य आणि शक्ती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर ते अग्रस्थानी आहेत. तरीही एका सुक्ष्म जीवाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. महासत्ता प्रथमच एवढा संघर्ष करताना दिसत आहे. महामारीची तयारी दर्शविणाऱ्या निर्देशांकात 83.5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर अमेरिकेस कोविड-19 चा सामना करताना कमालीचे अपयश आले आहे.

जगभरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.