ETV Bharat / international

कॅलिफोर्नियातील लसीकरणाला ब्रेक; मॉडर्नाच्या लसीमुळे अ‌ॅलर्जीच्या तक्रारी

"मॉडर्ना लसीच्या एका विशिष्ट लॉटमधून लस दिलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अ‌ॅलर्जिक रिअ‌ॅक्शन दिसून आली. यांपैकी सुमारे दहा जणांना २४ तासांपर्यंत निरीक्षणाखाली ठेवावे लागले होते, असे पॅन यांनी स्पष्ट केले. राज्यातील एकूण २८७ आरोग्यकेंद्रांमध्ये या लॉटमधील सुमारे ३ लाख ३० हजार डोस पाठवण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

California calls for pause in Moderna vax after allergic reactions
कॅलिफोर्नियातील लसीकरणाला ब्रेक; मॉडर्नाच्या लसीमुळे अ‌ॅलर्जीच्या तक्रारी
author img

By

Published : Jan 18, 2021, 8:54 PM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मॉडर्नाची लस दिल्यानंतर कित्येक लोकांना मोठ्या प्रमाणात अ‌ॅलर्जी जाणवू लागली होती. त्यामुळे, सध्या हे लसीकरण थांबवण्यात आल्याची माहिती कॅलिफोर्निया राज्याच्या रोगशास्त्रज्ञ डॉ. एरिका पॅन यांनी दिली आहे.

दहा जणांना ठेवावे लागले निरीक्षणाखाली..

"मॉडर्ना लसीच्या एका विशिष्ट लॉटमधून लस दिलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अ‌ॅलर्जिक रिअ‌ॅक्शन दिसून आली. यांपैकी सुमारे दहा जणांना २४ तासांपर्यंत निरीक्षणाखाली ठेवावे लागले होते, असे पॅन यांनी स्पष्ट केले. राज्यातील एकूण २८७ आरोग्यकेंद्रांमध्ये या लॉटमधील सुमारे ३ लाख ३० हजार डोस पाठवण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर आता मॉडर्ना, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र आणि अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन आता या लॉटमधील लसींची तपासणी करत आहे.

लसींमुळे रिअ‌ॅक्शन साधारण बाब, मात्र..

पेन म्हणाल्या की काही प्रमाणात लोकांना लसीमुळे अ‌ॅलर्जिक रिअ‌ॅक्शन होणे ही साधारण बाब आहे. मात्र, असे होण्याची शक्यता लाखात एक असते. या लॉटमधील लसी ज्यांना दिल्या, त्यांच्यापैकी अ‌ॅलर्जी झालेल्या लोकांची संख्या ही या प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक आहे, असे पॅन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.