ETV Bharat / international

जो बायडेन अन् जिल बायडेन यांना सोमवारी देणार फायझर लसीचा डोस

येत्या सोमवारी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना फायझर लसीचा डोस देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती त्यांच्या प्रेस सचिवाने दिली आहे. अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्रध्यक्ष कमला ह‌ॅरिस आणि त्याच्या पतीला पुढील आढवड्यामध्ये लसीचा डोस देण्यात येणार आहे.

बायडेन
बायडेन
author img

By

Published : Dec 19, 2020, 5:03 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - जगातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. येत्या सोमवारी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना फायझर लसीचा डोस देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती त्यांच्या प्रेस सचिवाने दिली आहे.

अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्रध्यक्ष कमला ह‌ॅरिस आणि त्याच्या पतीला पुढील आढवड्यामध्ये लसीचा डोस देण्यात येणार आहे. तर शुक्रवारी सकाळी सध्याचे उपराष्ट्रध्यक्ष माईक पेन्स आणि त्यांच्या पत्नी करेन पेन्स यांना कोरोनाची लस देण्यात आली.

कोरोना महामारीमुळे अमेरिकेवर सर्वांत जास्त प्रभाव झाला आहे. कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या अमेरिकेत फायजरच्या लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. याचबरोबर मॉडेर्ना लसीलाही परवानगी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेकडे सध्या कोरोना लसीचे दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

2021 च्या मध्यापर्यंत सर्वांना लस -

बायोटेक कंपनी मॉडेर्नाकडून अमेरिका अतिरिक्त 10 कोटी कोरोनाचे डोस विकत घेणार आहे. आधीच 10 कोटी डोसची ऑर्डर दिली असल्यामुळे आता एकूण 20 कोटी डोस मॉडेर्नाकडून अमेरिका घेणार आहे. कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. 2021 च्या मध्यापर्यंत गरज असलेल्या सर्वांना लस मिळावी, यासाठी अतिरक्त लसीची ऑर्डर दिली असून त्यामुळे लसीकरण कार्यक्रम पुढे नेण्याचा विश्वास निर्माण झाला आहे, असे अमेरिकेच्या आरोग्य सेवेच्या सचिवांनी सांगितले.

अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात -

गेल्या 15 डिसेंबरला अमेरिकेमध्ये प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिली होती. अमेरिकेमध्ये लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली. ही लस फायझर या कंपनीची आहे. फायझर लस निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे. फायझर या कंपनीने या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.

जो बायडेन यांचा जानेवरीत शपथविधी-

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले जो बायडेन यांचा शपथविधी समारोह जानेवारी महिन्यात होणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीतकमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्याचे नियोजन सुरू आहे. कोरोनामुळे यंदा शपथविधीचा सोहळा व्हर्च्युअली जास्त जण पाहण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 290 इलेक्ट्रोल व्होट्स त्यांना मिळाली असून अमेरिकेत आता नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे.

हेही वाचा - अमेरिकेत भारतीय वंशाचा डंका! 'व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव पदी वेदांत पटेल यांची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.