ETV Bharat / international

जगभरातील 'एलजीबीटीक्यू' समाजाच्या हक्कांसाठी बायडेन यांचा पुढाकार - बायडेन एलजीबीटीक्यू हक्क

आज होणाऱ्या स्टेट डिपार्टमेंटच्या भाषणामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन या मेमोची घोषणा करतील, असेही जॅक यांनी स्पष्ट केले. या हक्कांसाठी अमेरिका केवळ बोलत नाही, तर त्यादृष्टीने कार्यही करते हे यामधून दिसून येते.

Biden to sign memo on protecting LGBTQ rights globally
जगभरातील 'एलजीबीटीक्यू' समाजाच्या हक्कांसाठी बायडेन यांचा पुढाकार
author img

By

Published : Feb 5, 2021, 5:22 PM IST

वॉशिंग्टन : जगभरातील एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर) समुदायाच्या हक्कांसाठी जो बायडेन यांनी पुढाकार घेतला आहे. ते यासाठी एक अध्यक्षीय मेमो जारी करणार आहेत, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सल्लिव्हन यांनी गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) दिली.

आज होणाऱ्या स्टेट डिपार्टमेंटच्या भाषणामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन या मेमोची घोषणा करतील, असेही जॅक यांनी स्पष्ट केले. या हक्कांसाठी अमेरिका केवळ बोलत नाही, तर त्यादृष्टीने कार्यही करते हे यामधून दिसून येते. तसेच केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जगभरातील एलजीबीटीक्यू समुदायाच्या हक्कांच्या रक्षणासाठी अमेरिका तत्पर असल्याचेही यातून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

बायडेन यांच्या योजनेमध्ये या समुदायातील लोकांना भेदभावापासून संरक्षण देणे, न्यायव्यवस्थेत समान वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांना जागतिक पातळीवर नेणे याचा समावेश होता. या आपल्या वचनाशी बायडेन कटिबद्ध आहेत, आणि पदावर आल्यानंतर केवळ १०० दिवसांच्या आतच त्यांनी याबाबत काम सुरू केले आहे, असे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन प्साकी यांनी सांगितले.

हेही वाचा : उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची शेतकऱ्यांच्या समर्थनात, केलं 'हे' टि्वट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.