ETV Bharat / international

अमेरिकेतील 'सीडीसी'कडून राज्यांना कोरोना लसीच्या वितरणासाठी तयार राहण्याच्या सूचना - कोरोना लस अमेरिका

"वितरण स्थळे सुरू करण्यासाठी आलेल्या अर्जांवर तत्काळ काम सुरू करावे, अशी विनंती सीडीसी करत आहे. तसेच, ज्यामुळे वितरण स्थळे तयार करण्यात अडचणी येत असतील, अशा बाबी गरज पडल्यास रद्द कराव्यात,' असे रेडफील्ड यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना विषाणूवरील संभाव्य लस
कोरोना विषाणूवरील संभाव्य लस
author img

By

Published : Sep 3, 2020, 8:01 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि निवारण केंद्राने (सीडीसी) कोरोना विषाणूवरील संभाव्य लस एक नोव्हेंबरपासून वितरणासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. अशी सूचना राज्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, बुधवारी सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी सर्व राज्यांच्या राज्यपाल आणि आरोग्य विभागांना पत्र लिहून 'मॅककेसन कॉपोर्रेशन आणि त्यांच्या सहायक कंपन्यांना वितरण स्थळे सुरू करण्यासाठी परमिट मिळवण्यासाठी अर्ज मागवत आहे,' असे कळवले आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यात काही अडचणी असल्यास त्यांनी त्या सोडवण्यास राज्यपालांनी मदत करावी, असे पत्रात म्हटले आहे.

"वितरण स्थळे सुरू करण्यासाठी आलेल्या अर्जांवर तत्काळ काम सुरू करावे, अशी विनंती सीडीसी करत आहे. तसेच, ज्यामुळे वितरण स्थळे तयार करण्यात अडचणी येत असतील, अशा बाबी गरज पडल्यास रद्द कराव्यात,' असे रेडफील्ड यांनी पत्रात म्हटले आहे.

अमेरिकेत सध्या अनेक कोविड -19 लसी उमेदवार म्हणून क्लीनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. फायनान्शियल टाइम्ससोबत झालेल्या एका मुलाखतीत खाद्य आणि औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हेन म्हणाले की, ते तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल संपण्यापूर्वीच लस वितरणाच्या प्रक्रियेचा मार्ग तयार करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.