ब्राझीलिया - ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 69 हजार 826 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील संक्रमण झालेल्यांची एकूण संख्या 71 लाख 10 हजार 434 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी नवीन रुग्णांव्यतिरिक्त 1 हजार 92 मृत्यूंची नोंद झाली. यासह मृतांचा आकडा 1 लाख 84 हजार 827 पर्यंत वाढला आहे.
अमेरिका आणि भारतानंतर कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील सध्या जगात तिसर्या स्थानावर आहे. तसेच, अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांतही ब्राझील आहे.
साओ पाउलो हे देशातील कोविड - 19 चे केंद्र होते. दरम्यान, राज्याने फेब्रुवारी 2021 मध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असेल.
याव्यतिरिक्त, रिओ दि जानेरिओ स्टेट कोर्टाने पर्यटन स्थळ बुजिओस बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, सर्व पर्यटकांना येथून जाण्यास आणि 72 तासांत घरी परतण्यास सांगण्यात आले, जेणेकरुन हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद होऊ शकतील.