ETV Bharat / international

'या' आहार पद्धतीनेही होणार मधुमेहाचा उपचार

जर्नल डायबेटिक केअर यांचा एक नवा शोध पुढे आला आहे. त्यात मधुमेहाच्या उपचाराची नवीन पद्धत सांगण्यात आली आहे. या पद्धतीमुळे मधुमेह कमी होणार असल्याचे सदर संस्थेच्या शोधात पुढे आले आहे.

washington
ब्रेड
author img

By

Published : Dec 8, 2019, 12:07 PM IST

वाशिंग्टन (यू.एस.ए)- शरिरातील यकृत, स्नायू व चरबी पेशांमध्ये साखरीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी प्रकार-२ मधुमेहग्रस्त इन्सुलीनचे इंजेक्शन घेत असतात. पण, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो आणि शरिरातील साखरीचे प्रमाणही अनियांत्रित होते. मात्र, यावर जर्नल डायबेटिक केअर यांचा एक नवा शोध पुढे आला आहे. त्यात मधुमेहाच्या उपचाराची नवीन पद्धत सांगण्यात आली आहे.

जर्नल डायबेटिक केअरनुसार, सकाळी इन्सुलीन इंजेक्शन घेण्याएवजी मधुमेहग्रस्ताने स्टार्च असलेले पदार्थांचे सेवन करावे. त्याचबरोबर रात्री हलके जेवन घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. सकाळच्या सुमारास शरिरातील चयापचय क्रिया वाढलेली असते. आणि रात्रीच्या सुमारास ती मंदावली असते. यानुसार जेवण घेणे अपेक्षित असते. मात्र, प्रकार-२ मधुमेहग्रस्तांना दिवसातून अनेकदा ठरावीक वेळेत जेवण करावे लागते. त्यात रात्री झोपन्याअगोदर शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी देखील जवन करावे लागते. या आहार प्रक्रियेला ६-एम डाईट असे म्हटले जाते. मात्र, ते मधुमेह कमी करण्यात प्रभावकारक ठरत नाही. त्यामुळे मधुमेहग्रस्तांना इन्सुलीन आणि इतर औषधोपचारांची गरज भासते. मात्र, आम्ही केलेल्या आभ्यासानुसार स्टार्चयुक्त पदार्थ सकाळच्या सुमारास खालल्यास शरीरातीत ग्लुकोज कमी होते. तसेच ग्लायसेमिक देखील नियंत्रणात येत असल्याचे सदर शोधाच्या अग्रणी लेखीका व टी.ए.यू सॅकलर फॅकल्टी येथील प्राध्यापिका डॅनियाला जाकुबोवित्झ यांनी सांगितले आहे.

संशोधनादरम्यना आम्ही प्रकार-२ मधुमेह असलेल्या २९ लोकांवर प्रयोग केले होते. त्यांच्यावर आम्ही नवीन ३-एम आहार पद्धतीचा प्रयोग केला होता. या आहार पद्धतीत सकाळच्या जेवणात ब्रेड, फळे आणि मिष्ठान असतात तर रात्रीच्या जेवनात अल्प स्टार्चयुक्त पदार्थ आणि वरील पदार्थांची कमतरता असते. निष्कर्षामध्ये ६-एम आहार घेतलेल्या लोकांचे वजन कमी झाले नाही. त्याचबरोबर, त्यांच्या शरीरातील साखरेच्या प्रमाणातही काही फरक जाणवले नाही. उलट, त्यात इन्सुलीनची गरज भासली. तेच ३-एम आहार घेतलेल्यांचे वजन कमी झाले व त्यांचे साखरेचे प्रमाणही सुधारले होते. ३-एम आहार घेतलेल्या लोकांमध्ये इन्सुलीनचे घुटके घेण्याचे प्रमाणही घटले. काहींनी इन्सुलीनविनाच मधुमेहावर नियंत्रण मिळवला. यावरुन ३-एम डाईट हे मधुमेहाला नियंत्रित करण्यात प्रभावी आहे, असे सदर शोधाच्या अग्रणी लेखीका व टी.ए.यू सॅकलर फॅकल्टी येथील प्राध्यापिका डॅनियाला जाकुबोवित्झ यांनी सांगितले.

हेही वाचा- फेसबुकमुळे तब्बल 12 वर्षांनी झाली मुलीला मिळाले तिचे कुटुंब

Intro:Body:

https://www.aninews.in/news/lifestyle/fitness/starch-rich-breakfast-work-as-great-insulin-injection-replacement-for-diabetic20191207203053/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.