ETV Bharat / international

ब्राझीलच्या पंतप्रधानांनी फेटाळले 'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याचे वृत्त..

author img

By

Published : Mar 13, 2020, 10:54 PM IST

ब्राझीलचे पंतप्रधान जैल बोल्सोनारो यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले होते. मात्र, आता बोल्सोनारो यांनी स्वतःच पुढे येत आपल्याला या विषाणूची लागण झाली नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

Brazil's President Bolsonaro tests negative for coronavirus
ब्राझीलच्या पंतप्रधानांनी फेटाळले 'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याचे वृत्त..

रिओ डी जनैरो - ब्राझीलचे पंतप्रधान जैल बोल्सोनारो यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले होते. काही प्रतिष्ठित माध्यमांनी आपल्या ट्विटर हँडल्सवरून याबाबतची माहिती दिल्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू होती.

मात्र, आता बोल्सोनारो यांनी स्वतःच पुढे येत आपल्याला या विषाणूची लागण झाली नसल्याचा निर्वाळा दिला आहे. मी कोरोना 'निगेटिव्ह' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात त्यांनी फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर मायदेशी परतल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी स्वतःच आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मोदींचे 'सार्क'ला आवाहन; 'या' देशांनी दर्शवली सहमती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.