ETV Bharat / international

इथिओपियामध्ये बसवर दहशतवादी हल्ला; ३४ ठार - इथिओपिया हिंसाचार

शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियाच्या पश्चिमी भागातील बेनिशंगुल-गुमेज या राज्यामध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हा हल्ला कशामुळे करण्यात आला, किंवा कोणत्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

34 killed in terror attack on bus in Ethiopia
इथिओपियामध्ये बसवर दहशतवादी हल्ला; ३४ ठार
author img

By

Published : Nov 16, 2020, 7:22 AM IST

अदीस अबाबा : इथिओपिया देशामध्ये शनिवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. एका बसवर झालेल्या या हल्ल्यामध्ये सुमारे ३४ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशाच्या मानवाधिकार आयोगाने याबाबत माहिती दिली.

शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियाच्या पश्चिमी भागातील बेनिशंगुल-गुमेज या राज्यामध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हा हल्ला कशामुळे करण्यात आला, किंवा कोणत्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

देशांतर्गत हिंसाचाराने इथिओपिया त्रस्त..

देशातील विविध गटांमधील वाढत्या हिंसाचारामुळे इथिओपिया त्रस्त झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.

या गटांमधील हिंसाचार हा प्रामुख्याने जमिनीसाठी आणि सत्ता गाजवण्यासाठी होत आहे.

हेही वाचा : पाकिस्तानात दिवाळी उत्साहात साजरी; रोषणाई आणि फुलांनी सजवले मंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.