ETV Bharat / headlines

कोरोनाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी उपचारांचा मार्ग मोकळा - कोविड उपचार न्यूज

आता आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप घरोघरी होण्याची शक्यता आहे. तर, आयुष काढा, गरम पाणी, गुळण्या, हळदीचे दूध, संशमनी वटी, च्यवनप्राश असे सर्व उपाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी उपचार
आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी उपचार
author img

By

Published : Jun 9, 2020, 2:41 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांना आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी उपचार देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी, या उपचारांद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे म्हणत आयुष टास्क फोर्सने काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती. या तत्त्वांना सोमवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार, आता राज्यात आयुष डॉक्टर रुग्णांवर उपचार सुरू करू शकणार आहेत.

आयुष उपचार पद्धतीद्वारे उपचार करत रूग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सरकारने आयुष टास्क फोर्स तयार केले. पण तीन आठवड्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे लालफितीत अडकल्याने ही उपचार पद्धती सुरू होऊ शकली नव्हती. पण मंगळवारी याला सरकारने मान्यता दिल्याने आता आमचे आयुष डॉक्टर सौम्य रुग्णांसह सर्वसामान्य नागरिकांना आयुर्वेदिक-होमिओपॅथी-युनानी औषधे देऊ शकतील, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिली आहे. सौम्य रुग्णांना वेळेत ही औषधे दिली तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून ते नक्कीच कमी दिवसात बरे होतील. शिवाय, रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होऊन आपोआप मृत्यू दर ही कमी होईल, असा दावाही डॉ. कुलकर्णी यांनी केला आहे.

कोरोना संसर्ग झालेला रुग्ण, सौम्य लक्षणे असलेला रुग्ण यावर हे उपचार केले जाणार आहेतच. पण कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी असते. तेव्हा कोरोना न झालेल्यांनाही आवश्यक ती औषधे आता देणार येणार असल्याची माहिती टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. शुभा राऊळ यांनी दिली आहे. तर आता आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप घरोघरी होण्याची शक्यता आहे. तर, आयुष काढा, गरम पाणी, गुळण्या, हळदीचे दूध, संशमनी वटी, च्यवनप्राश असे सर्व उपाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.