ETV Bharat / headlines

आसाममध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 41 हजार 726 वर - कोरोना अपडेट

आसाममध्ये गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 457 जण कोरोनाबाधित आढळले आहे. कोरोना रुग्णांची संख्या 41 हजार 726 वर पोहचली आहे. तर मृताची संख्या 101 वर पोहचली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 2, 2020, 1:26 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आसाममध्ये गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 457 जण कोरोनाबाधित आढळले आहे. कोरोना रुग्णांची संख्या 41 हजार 726 वर पोहचली आहे. तर मृताची संख्या 101 वर पोहचली आहे.

गेल्या 24 तासांत 27 हजार 161 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 457 जण बाधित आढळले आहेत. तर काचरमधील दोन आणि गोलाघाट येथील एक अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

आसाम सरकार शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी हळूहळू योजना आखत आहे. राज्यातील काही शाळा आणि शैक्षणिक संस्था 1 सप्टेंबरपासून उघडल्या जाऊ शकतात. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आसामच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कोरोना चाचण्या अनिवार्य असून 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येतील. जे नकारात्मक आढळतील त्यांनाच शिकवणी घेण्याची परवानगी देण्यात येईल. मार्चपासून शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे राज्यातील अनेक अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सध्या विविध कोरोनाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.