ETV Bharat / headlines

मुख्यमंत्री ठाकरे यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

author img

By

Published : Aug 20, 2020, 3:00 PM IST

राजीव गांधी यांनी दूरसंचार आणि संगणकाचे युग आणल्याने आपला देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांचे हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. 'सद्भावना दिवस' म्हणून त्यांचे स्मरण करताना स्वर्गीय राजीवजींना विनम्र अभिवादन केले

मुख्यमंत्री ठाकरे यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुख्यमंत्री ठाकरे यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच 'सद्भावना' दिवसानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञाही दिली.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणाले, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांनी दूरसंचार आणि संगणकाचे युग आणल्याने आपला देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांचे हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. 'सद्भावना दिवस' म्हणून त्यांचे स्मरण करताना राजीवजींना विनम्र अभिवादन केले.

राजीव गांधी यांची आज 75 वी जयंती आहे, या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिली आहे, तसेच राहुल गांधी यांनी आज वीरभूमीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.