वॉशिंग्टन डी. सी - चीनमधील वुहान प्रांतातून कोरोना विषाणूची सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरात या विषाणूने थैमान सुरु झालं. लाखोंच्या संख्येने कोरोनाची लागण झाली असून रुग्ण या विषाणूशी झुंज देत आहेत. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये 2 लाख 59 हजार 37 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 744 जणांचा बळी गेला आहे.
अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 80 लाख 25 हजार 877 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, तब्बल 6 लाख 88 हजार 962 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 1 कोटी 13 लाख 33 हजार 831 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 लाख 64 हजार 318 ऐवढी असून 1 लाख 57 हजार 898 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझिल दुसऱ्या क्रमाकांवर असून 27 लाख 8 हजार 876 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 93 हजार 616 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण 17 लाख 50 हजार 724 झाली आहे. तसेच भारतापाठोपाठ रशिया, दक्षिण अफ्रिका आणि पेरूमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.