ETV Bharat / headlines

हुतात्मा संदीप खर्डेंना साश्रू नयनांनी निरोप; मे महिना त्यांच्यासाठी होता सुखाची पर्वणी - gadchiroli naxal attack

सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खर्डे या जवानाच्या काळजाचा तुकडा असलेल्या २ वर्ष वयाच्या नयना या मुलीचा ७ मे रोजी वाढदिवस होता.

हुतात्मा संदीप खर्डे
author img

By

Published : May 3, 2019, 12:15 PM IST

Updated : May 3, 2019, 6:43 PM IST

जालना - नक्षलवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले संदीप खर्डेंना शासकीय इतमामात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मूळचे आळंद (तालुका - देऊळगाव राजा, जिल्हा - बुलढाणा) येथील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खर्डे या जवानाच्या काळजाचा तुकडा असलेल्या २ वर्ष वयाच्या नयना या मुलीचा ७ मे रोजी वाढदिवस होता.

हुतात्मा संदीप खर्डेंना साश्रू नयनांनी निरोप

तसेच याच महिन्यात १२ मे रोजी लग्नाचा चौथा वाढदिवस होता, असे सुखाचे दिवस आणि आनंदाच्या क्षणाची जुळवाजुळव करत असतानाच संदीपला नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आले. चार वर्षांपूर्वी येथून जवळच असलेल्या अंढेरा या गावातील हरिभाऊ कायंदे यांच्या स्वाती नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. पती-पत्नी दोघेही नागपूरला राहत असताना त्यांच्या या वेलीवर कन्यारत्न फुलले. त्यामुळे संदीप खूप आनंदी होता.

संदीपची सासरवाडी अंढेरा येथे औंढेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या महादेवाच्या यात्रेची समाप्ती उद्या ४ मे रोजी होणार होती. त्यासाठीदेखील संदीपचा इकडे येण्याचा प्रयत्न सुरू होता. शिवाय मे महिना संदीपसाठी आनंदचा महिना होता. कारण ७ तारखेला त्याच्या चिमुकली नयनाचा तर, १२ तारखेला लग्नाचा चौथा वाढदिवस होता. या सर्व आनंदाच्या क्षणात सहभागी होण्याऐवजी संदीप आपल्या कुटुंबाला सोडून गेल्याचे दुःख या कुटुंबीयांवर कोसळले आहे.

संदीपच्या पश्चात त्याचा लहान भाऊ दीपक आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे. घराजवळच असलेल्या संदीपवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संदीपच्या काकांच्या खांद्यावर असलेल्या चिमुकल्या नयनाचा आवाज निघत नव्हता. मात्र, तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या अखंड धारा पाहून उपस्थितांचे ह्रदय पिळवटून टाकत होते.

Intro:संदीपच्या मुलीचा 4 तारखेला तर लग्नाचा होता सात तारखेला वाढदिवस
जालना
नक्षलवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेला आळंद (तालुका देऊळगाव राजा ,जिल्हा बुलढाणा) सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे या जवानाच्या काळजाचा तुकडा असलेल्या दोन वर्ष वयाच्या नयना या मुलीचाउद्या दि 4रोजी वाढदिवस होता.तसेच याच महिन्यात 12 मे रोजी लग्नाचा चौथा वाढदिवस होता. असे सुखाचे दिवस आणि आनंदाच्या क्षणाची जुळवाजुळव करत असतानाच संदीप वर झालेल्या हल्ल्यामुळे या सुखा चे रूपांतर दुःखाचा डोंगरात झाले. चार वर्षांपूर्वी येथून जवळच असलेल्या अंढेरा या गावातील हरिभाऊ कायंदे यांच्या स्वाती नावाच्या मुलीशीत्यांचे लग्न झाले. पती-पत्नी दोघेही नागपूरला राहत असताना त्यांच्या या वेलीवर कन्यारत्न फुलले. मुली सोबत जसा वेळ मिळेल तसा, मिळालेले क्षण आनंदा मध्ये घालून आपले कर्तव्य निभावत होत रात्र असो किंवा दिवस मुली सोबत त्यांना धिंगाणा करणेत्याला आवडत होते. संदीप ची सासरवाडी अंढेरा येथे औंढेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या महादेवाच्या यात्रेची समाप्ती उद्या 3 आणि 4 रोजी होणार होती. त्यासाठीदेखील संदीपचा इकडे येण्याचा प्रयत्न सुरू होता. मे महिन्यात त्यासाठी आनंदचा चा महिना होता तीन आणि चार मे ला यात्रेची समाप्ती, सात तारखेला काळजाचा तुकडा पोटचा गोळा नयना दोन वर्षीय चिमुकलीचा वाढदिवस, अर्धांगिनीसोबत आयुष्याचे स्वप्न रंगवण्याचा म्हणजेच लग्नाचा 12 तारखेला चौथा वाढदिवस या सर्व आनंदाच्या क्षणात सहभागी होण्या ऐवजी संदीप आपल्या परिवाराला सोडून गेल्याचे दुःख या कुटुंबीयांवर कोसळले आहे. संदीपच्या पश्चात त्याचा लहान भाऊ दीपक आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे घराजवळच असलेल्या संदीप वर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.या वेळी संदीपच्या काकांच्या खांद्यावर असलेल्या चिमुकल्या नयनाचा आवाज निघत नव्हता,मात्र डोळ्यासमोर दिसणारे चित्र तिला कळत नव्हते असेही नाही, तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आशूच्या अखंड धारा पाहून,तिच्या चेहऱ्यावर दिसणारे दुःख ह्रदय पिळवटून टाकत होते.Body:सोबत फोटो आणि व्हिडीओConclusion:
Last Updated : May 3, 2019, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.