ETV Bharat / headlines

अमेरिकेत सत्तापालट झाला तर....बिडेन यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध कसे असतील?

author img

By

Published : Aug 9, 2020, 3:19 PM IST

बिडेन जरी राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तरी भारताबरोबरच्या अमेरिकेच्या नीतीत बदल होणार नाहीत. दक्षिण चीन समुद्रातील चीनची दादागिरीची भूमिका आणि व्यापारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका संबंधात बदल होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये येत्या काही महिन्यांत अध्यक्षपदाच्या निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीही सुरु झाली आहे. निवडणूक पूर्व चाचण्यांमधून डेमॉक्रॉटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचा विजय होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अमेरिका आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद सुरु आहेत. व्यापार हा त्यातील एक महत्वाचा मुद्दा आहे, तर बिडेन राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भारत-अमेरिका संबंध कसे असतील? हा प्रश्न भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बिडेन हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष देखील होते. ड्रम्प यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध सुधारले आहेत. या मार्गावरून बिडेन मागे हटण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मागील दोन दशकांपासून भारत अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा आलेख उंचावत आहे. शी जिनपिंग चीनच्या अध्यक्षपदी आल्यानंतर जागतिक स्तरावर चीनला सर्वोच्च स्थानी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, अमेरिकेने चीनच्या या प्रयत्नावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. अमेरिकेत आत्ता निवडणुका झाल्या तर जो बिडेन हे निवडून येतील, असे मतदान पूर्व चाचण्यातून समोर येत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत.

फायनान्शिअल टाईम्सच्या अंदाजानुसार डेमोकॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना एकूण 538 पैकी 308 मते मिळतील तर ट्रम्प यांना फक्त 113 मते मिळतील. उमेदवाराला विजयी होण्यासाठी 270 मतांची गरज आहे. त्यामुळे या चाचणीतून निकाल बिडेन यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोना संकट हातळण्यावरूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. जगभरात कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित देश अमेरिका आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक असून नागरिकांमध्येही संताप आहे. कोरोना संकट हाताळण्यात ट्रम्प यांना अपयश आल्यानेच ते चीनवर टीका करत आहेत, असेही ट्रम्प यांचे विरोधक आणि चीन म्हणत आहे. तसेच ट्रम्प यांनी नियोजित 3 नोव्हेंबरच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक पूढे ढकलण्याचे नियोजन केेले आहे. तसेच कोरोनामुळे पोस्टाद्वारे मतदान होण्याची शक्यता असल्याने निकालाचा अचूक अंदाज लावता येणे शक्य नाही.

बिडेन जरी राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तरी भारताबरोबरची अमेरिकेच्या नीतीत बदल होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनची दादागिरीची भूमिका आणि व्यापारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका संबंधात बदल होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारत-अमेरिका संबंध निर्णायक क्षणी पोहचल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव पिनक राजन चक्रवर्ती यांचे मत आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये जागतिक स्तरावर सामरीक भागीदारी आहे. तसेच यास दोन्ही देशांतील नागरिकांचाही पाठिंबा आहे. दोन्ही देशांतील समान लोकशाही मूल्ये, वाढत जाणारे द्विपक्षीय हितसंबंधांचे मुद्दे आणि प्रादेशिक आणि जागतिक प्रश्न संबंधाचा पाया ठरत आहेत. भारत अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातीलही मोठा भागीदार आहे. तसेच राजनैतिक स्तरावरही भारत अमेरिकेचा साथीदार आहे.

अमेरिका- भारत पॉलिटिकल अ‌ॅक्शन कमिटीचे संस्थापक रोबिंदर सचदेव म्हणतात, बिडेन राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तरी भारत अमेरिका संबंध सुधारतच जातील. मात्र, जर अमेरिकेच वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक सदस्यांचे वर्चस्व आले तर भारत अमेरिका संबंधांवर परिणाम होऊ शकतात. कारण डमोक्रॅटिक पक्षातील अनेक नेते भारत धार्जीणे नाहीत. त्यामुळे बिडेन जरी राष्ट्राध्यक्ष पदावर असले तरी सिनेटचा प्रभाव भारत अमेरिका नीतींवर होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.