ETV Bharat / headlines

Funeral of Unclaimed Bodies in Pune : पुण्यात 1231 बेवारसांवर अंत्यसंस्कार, जाणून घ्या पालिकेची अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया?

२०२१ या वर्षात पुणे महानगर पालिकेने ओळख पटलेल्या २४४ आणि ओळख न पटलेल्या जवळपास ८०० ते ९०० बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार ( Funeral of Unclaimed Bodies in Pune ) केले आहेत. ही आकडेवारी खरचं थक्क करणारी आहे. या साऱ्या प्रक्रियेसाठी महानगरपालिका प्रशासनाने एक टीम तयार केली असून या सगळ्या बेवारस मृतदेहांवर योग्य रितीने अंत्यसंस्कार केले जातात अशी माहिती महानगरपलिकेच्या अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत ( PMC Official on Funeral of Unclaimed Bodies ) यांनी दिली आहे.

Funeral of Unclaimed Bodies in Pune
पुण्यात 1231 बेवारसांवर अंत्यसंस्कार
author img

By

Published : Jan 10, 2022, 4:36 PM IST

Updated : Jan 10, 2022, 4:59 PM IST

पुणे - एखाद्या आजाराने बेजार होऊन आपल्या घरापासून किंवा आपल्या नात्यातील माणसांपासून दूर येऊन त्या आजाराशी लढताना अनेकांचे निधन हे फूटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला होते. या बेवारस मृतदेहांवर त्यांच्याच आपल्या माणसांकडून अंत्यसंस्कार होतील इतक देखील त्यांचे नशीब नसत, ही बाब जरी काळजाला वेदना देणारी असली तरी हे आजच्या समजातलं सत्य आहे. हे ही तितकंच खरं.

पुण्यात 1231 बेवारसांवर अंत्यसंस्कार

२४४ बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार -

पुणे शहरात गेल्या वर्षभरात तब्बल २४४ बेवारस मृतदेह आढळून ( Funeral of Unclaimed Bodies in Pune ) आलेत. त्यांची ओळख पटू न शकल्याने शेवटी त्यांच्यावर महापालिकेकडूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे शहरात वेगवेगळ्या शहरातून अनेक जण येत असतात. बरेच जण हे घरच्यांशी झालेल्या वादातून घर सोडून येतात, अनेक लोकांना हे त्यांच्याच घरचेच सांभाळायला तयार नसतात म्हणून पुण्यात येतात. त्यातच काही ज्येष्ठ नागरिक आपल्याला संभाळण्याचा त्रास हा आपल्या घरच्यांना होऊ नये म्हणून आपणच आपल घर सोडून निघून येतात. काही लोकांचे आजाराने तर काहींचे वृध्पकाळाने निधन होते मग अशांचा अंत्यविधी करणार कोण? असा प्रश्न उभा राहतो.

मरणा नंतरही हाल संपेना -

मग अशा वेळी पुढे येत ते प्रशासन. अशा बेवारस निधन झालेल्यांची ओळख पटवण्यासाठी मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना कळविली जाते. पोलीस मग संबंधित ठिकाणी जाऊन त्यांचा मृतदेह प्रामुख्याने ससून रुग्णालयात आणतात. तेथे डॉक्टरांकडून तपासणी झाल्यावर त्यांना मृत घोषित केले जाते. ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून मृतदेह जतन करण्यासाठी ससून हॉस्पिटलला पत्र दिले जाते.

अशी पार पाडली जाते प्रक्रिया ( How unclaimed bodies are cremated ) -

ओळख न पटलेल्या मृताची पोलिसांकडून त्यांचे वर्णन, पेहराव, अंगावरील कपडे, फोटो आदीच्या साहाय्याने बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. आणि नंतर अशांचा फोटो राज्यभरातील पोलीस ठाण्यातून हरविलेल्या व्यक्ती संदर्भातील माहिती घेतली जाते. मात्र, ओळख पटली नाही, तर कोणताही नातेवाईक, आप्तस्वकीय समोर आला नाही. तर पोलिसांकडून महापालिकेला पत्र दिले जाते. ससून हॉस्पिटलमध्ये मृतदेह जतन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने सध्या बेवारस मृतदेह केवळ ३ दिवस ठेवण्यात येतो. त्यानंतर, महापालिकेकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

एका वर्षात १२३१ जणांचा अंत्यसंस्कार -

दरम्यान जर पूर्णवर्षाची एकूण आकडेवारी पहिली तर ती थक्क करणारी आहे. २०२१ या वर्षात पुणे महानगर पालिकेने ओळख पटलेल्या २४४ आणि ओळख न पटलेल्या जवळपास ८०० ते ९०० बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत. ही आकडेवारी खरच थक्क करणारी आहे. या साऱ्या प्रक्रियेसाठी महानगरपालिका प्रशासनाने एक टीम तयार केली असून या सगळ्या बेवारस मृतदेहांवर योग्य रितीने अंत्यसंस्कार केले जातात अशी माहिती महानगरपलिकेच्या अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली आहे.

हेही वाचा - PM Modi Picture On Vaccination Certificate : ...म्हणून या 5 राज्यात लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवला

Last Updated : Jan 10, 2022, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.