ETV Bharat / entertainment

Tina Datta vs Priyanka Choudhary: टीव्हीच्या लोकप्रिय दोन 'बहुं'चा बिग बॉसच्या किचनमध्ये राडा - Priyanka Chaudhary fight in the kitchen

बिग बॉस 16 च्या आगामी एपिसोडमध्ये टीना दत्ता आणि प्रियांका चौधरी यांच्यात भांडण होणार आहे. टीना आणि प्रियंका चौधरी या टेलिव्हिजनच्या आवडत्या बहू आहेत आणि स्वयंपाकघरातील कर्तव्यांवरुन त्यांच्यात बिनसले आहे.

दोन 'बहुं'चा बिग बॉसच्या किचनमध्ये राडा
दोन 'बहुं'चा बिग बॉसच्या किचनमध्ये राडा
author img

By

Published : Nov 11, 2022, 4:11 PM IST

मुंबई - बिग बॉसच्या 16व्या सीझनमध्ये वादविवाद, भांडणे, मारामारी अशाी घटना नित्याच्या झाल्या आहेत. या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या आगामी भागामध्ये टीना दत्ता आणि प्रियंका चौधरी यांच्यात स्वयंपाकघरातील कर्तव्यांवरून संघर्ष झालेला पाहायला मिळणार आहे.

एपिसोडच्या प्रोमोमध्ये टीना इतर स्पर्धकांना भातासाठी थांबायला सांगते कारण प्रियांकाने आधीच गॅसचा ताबा घेतलेला आहे आणि तिला भात शिजवता येत नाही. यावरुन दोघींमध्ये भांडणाला सुरुवात होते.

प्रियंका हे प्रकरण ताणून सांगते की टीना तिला चपात्या बनवायला सांगत नाही आणि पॅन बाजूला ठेवत आहे त्यामुळे तिला चपात्या बनवता आल्या नाहीत. त्यावर टीना उत्तर देते: "फटा हुआ टेप रेकॉर्डर चलाती रहती है." टीनाने प्रियांकाला "माझ्या हाताशी बोल" असे सांगत प्रोमो संपण्यापूर्वी दोघांनी एकमेकींचा अपमान केला.

दरम्यान, शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यातील प्रचंड वादानंतर आता टीना दत्ता आणि प्रियंका चौधरी यांचा वाद बिग बॉसच्या घरात रंगतदार बनला आहे.

हेही वाचा - डेनिम शॉर्ट्स आणि निळ्या शर्टमधील सोनाली सहगलचे फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.