ETV Bharat / entertainment

'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती - प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती

कानडी नायिका आणि कोल्हापुरी नायक यांची प्रेमकथा 'जिवाची होतिया काहिली' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका पुढे नेण्यासाठी त्यात अजून एका नवीन पात्राची एंट्री होत आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchnale) प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय.

Jivachi Hotiya Kahili
जिवाची होतिया काहिली
author img

By

Published : Nov 7, 2022, 4:18 PM IST

हैदराबाद: कानडी नायिका आणि कोल्हापुरी नायक यांची प्रेमकथा 'जिवाची होतिया काहिली' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका पुढे नेण्यासाठी त्यात अजून एका नवीन पात्राची एंट्री होत आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchnale) प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती: सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. अर्जुन रेवथीच्या प्रेमात पडला असून रेवथीनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेते आहे. अर्जुन आणि रेवथी (Arjuna and Revathi) यांच्यात चांगली मैत्री झाली असून अर्जुन आपले प्रेम व्यक्त करणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

अर्जुन आणि रेवथी यांच्यामध्ये भांडण होईल का: त्यातच आता मालिकेत नवीन व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. ती म्हणजेच मनीषाची. सिमरन ही गुणी अभिनेत्री मनीषाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. सिमरनची ही पहिलीच मालिका असून ती तिची व्यक्तिरेखा कशी रंगवते हे पाहणे रंगतदार ठरणार आहे. मनीषा आल्याबरोबरच सगळ्यांची मने जिंकते आणि त्यामुळे रेवथीच्या मनात राग निर्माण होऊन अर्जुन आणि रेवथी यांच्यामध्ये भांडण होईल का, हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे. आता त्यांच्या गोष्टीला काय नवीन वळण मिळणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya kahili), प्रसारित होते सोमवार ते शनिवार, संध्या. ७.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.