मुंबई : जेव्हा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) निखिल कामत दिग्दर्शित 'लय भारी' मधून मराठीमध्ये अभिनय पदार्पण करीत होता. तेव्हा सलमान खानने (Salman Khan) रितेशला गळ घातली की, त्याला देखील त्या चित्रपटचा भाग व्हावयाचे आहे. चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता आणि त्यात बदल करणे शक्य नव्हते. परंतु रितेशने सलमान भाऊ साठी एक स्वतंत्र प्रवेश लिहून घेतला आणि चित्रित केला. (Salman Khan in the movie Ved) आता त्याच्या दिग्दर्शन पदार्पणात सुद्धा ही 'भाऊ गिरी' अजून दोन पावले पुढे गेली असून सलमानसाठी एक अख्खे गाणे बनविण्यात आले आहे. (Latest Movi Ritesh Deshmukh)
जिनीलिया देशमुखचे 'वेड' चित्रपटातून पदार्पण : 'वेड लावलंय' या गाण्याला अजय अतुल यांचे संगीत लाभले असून त्यांनीच या गीताचे बोल लिहिले आहेत. हे गाणे विशाल ददलानी आणि अजय गोगावले यांनी स्वरबद्ध केले असून विशालचा आवाज सलमानसाठी वापरण्यात आला असून रितेश अजयच्या आवाजात गाताना दिसतोय. या गाण्यात सलमान भाऊ रितेशला जिनीलिया सोबत कसे वागले पाहिजे याची कल्पना देताना दिसतोय. जिनीलिया देशमुख 'वेड' या चित्रपटातून मराठीमध्ये अभिनय पदार्पण करीत आहे.
'वेड लागलंय' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला : एकंदरीतच 'वेड लागलंय' हे अतिशय गोड गाणे असून त्यातील सलमानच्या उपस्थितीने ते आणखी गोड वाटते. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.