मुंबई - Maharashtracha Foveate Kon awards : सध्या महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी सुरु असून प्रत्येक नेता मीच महाराष्ट्रातील जनतेचा फेवरेट आहे असे सांगताना दिसतोय. त्या प्लॅटफॉर्मवर जरी मनोरंजन होत असले तरी जनता आपल्या रुटीनमध्ये मग्न असून सिनेमा, मालिका आणि नाटकं यातूनच मनोरंजित होताना दिसतेय. झी मराठी वाहिनीतर्फे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हे पुरस्कार रसिकांच्या वोटिंग वरून निवडले जातात. सालाबादप्रमाणे यावर्षीही 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' पुरस्कारांचे वेध रसिक आणि सेलिब्रिटीज यांना लागले असून त्यांची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत.
-
कोणत्या लेखकाला मिळेल समीक्षकांची पोचपावती ? ☺️#ZeeTalkies #MaharashtrachaFavoriteKon #MFK #MFK2023 #Award #AwardShow #VoteNow pic.twitter.com/PflwD5xJTN
— Zee Talkies (@ZeeTalkies) January 14, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कोणत्या लेखकाला मिळेल समीक्षकांची पोचपावती ? ☺️#ZeeTalkies #MaharashtrachaFavoriteKon #MFK #MFK2023 #Award #AwardShow #VoteNow pic.twitter.com/PflwD5xJTN
— Zee Talkies (@ZeeTalkies) January 14, 2024कोणत्या लेखकाला मिळेल समीक्षकांची पोचपावती ? ☺️#ZeeTalkies #MaharashtrachaFavoriteKon #MFK #MFK2023 #Award #AwardShow #VoteNow pic.twitter.com/PflwD5xJTN
— Zee Talkies (@ZeeTalkies) January 14, 2024
समीक्षक पसंती पुरस्काराचा समावेश - महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2024 मध्ये यावेळी एक नवा पुरस्कार देण्यात येणार असून समीक्षक पसंती पुरस्कार हा विभाग यंदा नव्याने समाविष्ट केला आहे. यामध्ये फेवरेट लेखक म्हणून निखील महाजन आणि प्राजक्त देशमुख यांना 'गोदावरी' चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे तर परेश मोकाशी यांना 'आत्मपॅम्प्लेट'साठी नामांकित करण्यात आलंय. सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर यांची 'तेंडल्या'साठी निवड झाली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची 'वाळवी' चित्रपटाच्या लेखनासाठी निवड झाली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी आणि नागराज मुंजुळे यांना 'नाळ 2' च्या लेखनासाठी समीक्षकांच्या पसंती पुरस्कारासाठी नामांकनाच्या यादीत निवडले आहे. तर सुनिल सुकथनकर यांना 'श्यामची आई' चित्रपटाच्या लेखनासाठी या यादीत नामांकित करण्यात आलंय.
मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हे पुरस्कार प्रेक्षकांच्या निवडीवर अवलंबून असतात. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनंतर या जाहीर झालेल्या नावांमधून ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ निवडले जाणार असून त्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट लोकप्रिय चेहरा, फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत यासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. या श्रेणीमध्ये आता समीक्षक पसंती पुरस्काराचा समावेश करण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी वेड, बाईपण भारी देवा, सुभेदार, महाराष्ट्र शाहीर, वाळवी, नाळ २, झिम्मा २, घर बंदूक बिरयानी या चित्रपटांमध्ये चुरस असणार आहे. ‘फेवरेट दिग्दर्शक’ या नामांकनामध्ये रितेश देशमुख, केदार शिंदे, दिग्पाल लांजेकर, परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी सुधाकर रेड्डी यक्कंटी, हेमंत ढोमे, हेमंत अवताडे यांच्यात स्पर्धा असेल.
‘फेवरेट अभिनेता’ साठी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, सुबोध भावे, नागराज मंजुळे आणि अजय पुरकर यांच्यात कॉम्पिटिशन असेल तर ‘फेवरेट अभिनेत्री’ या विभागाअंतर्गत ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील अभिनेत्रींची टीम तसेच 'वेड' चित्रपटासाठी जिनिलीया देशमुख, ‘झिम्मा २’ या चित्रपटातील अभिनेत्रींची टीम आणि 'वाळवी' साठी शिवानी सुर्वे यांच्या नावांचा नामांकनात समावेश आहे.
विविध विभागातील 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. हा दिमाखदार पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना लवकरच झी टॉकीज वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -