ETV Bharat / entertainment

सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी चिकनवर वर्षभर डिस्काउंट, 'कोंबडी'वाल्या फॅनची जबरा ऑफर - Sunny Leone Unique Fan

सनी लिओनीचे चाहत्या सर्वात वेगळे आहेत. तिच्यासाठी काय पण करायला ते तयार असतात. कर्नाटकातील एक चिकन विक्रेताही तिचा असाच डाय हार्ट फॅन आहे. त्याने काही अटींवर सनी लिओनीसाठी चिकन विक्रीवर डिस्काउंटची ऑफर दिली आहे. अटीदेखील फार गंमतीशीर आहेत. वाचा ही बातमी...

सनी लिओनी
सनी लिओनी
author img

By

Published : Apr 15, 2022, 1:00 PM IST

Updated : Apr 15, 2022, 1:11 PM IST

मंड्या (कर्नाटक): बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते संपूर्ण भारतात आहेत. पण मंड्यातील एक कोंबडी विक्रेता तिचा मोठा चाहता आहे. त्याचे दुकान सनी लिओनीच्या फोटोंने भरलेले आहे. आता तो सनी लिओनीच्या चाहत्यांना चिकन खरेदीवर सूट देत आहे. चिकन विक्रेता प्रसाद सांगतो की, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या अटींनुसार फॅन असल्याचे सिद्ध केले तर तो वर्षभर 10% सूट देतो.

सनी लिओनीचा 'कोंबडी'वाला जबरा फॅन
सनी लिओनीचा 'कोंबडी'वाला जबरा फॅन

मंड्यातील नुराडी रोडवरील कर्नाटक बार सर्कलमध्ये दुकानदार प्रसाद यांचे चिकनचे दुकान आहे. त्याने दुकानाच्या गेटवर सनी लिओनीचा फोटो असलेला डिस्काउंट ऑफरचा बोर्ड लावला आहे. पण स्वतःला फॅन म्हणवून त्याच्याकडून चिकन घ्याल असं नाही. त्यासाठी त्यांनी भारीपैकी अटी ठेवल्या आहेत.

अट 1: ग्राहकाने सनी लिओनला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करणे आवश्यक आहे. दुसरी अट : सनी लिओनीचे किमान दहा फोटो मोबाईलमध्ये दाखवावे लागतील. तिसरी अट: ज्या ग्राहकांना चिकनमध्ये सूट हवी आहे त्यांनी सनी लिओनीच्या फोटोंना लाईक आणि कमेंट करावी लागेल. चिकन विक्रेत्याच्या या कल्पनेनंतर सनी लिओनीला किती फॅन्स मिळाले हे माहीत नाही. पण त्याच्या बोर्डाचा आणि अटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Ranbir Alia Wedding : रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका आणि कॅटरिनाने भरभरुन दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

Last Updated : Apr 15, 2022, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.