ETV Bharat / entertainment

कोठारे व्हिजनची नवी मालिका ‘माझी माणसं', प्रमुख भूमिकेत जानकी पाठक! - नवी मालिका माझी माणसं

कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ‘माझी माणसं' ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. महाराष्ट्रातील मालवण या भागातील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मालिकेचे हे कथानक कोकणातील निसर्गसौंदर्याप्रमाणेच उत्तरोत्तर फुलत जाणार आहे.

जानकी पाठक
जानकी पाठक
author img

By

Published : May 31, 2022, 5:23 PM IST

प्रादेशिक वाहिन्या आता आपले जाळे देशभरात पसरवू लागल्या आहेत. दक्षिण भारतातील प्रसिद्ध वाहिनी सन टीव्ही आता मराठितताही दिसू लागली आहे. किंबहुना लॉकडाऊनच्या काळात सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस आली. सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या मालिका आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात घेऊन जातात. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील राहणीमान, तेथील संस्कृती आणि विविधता यांचा सुरेख मिलाप आपल्याला या मालिकांमध्ये पहायला मिळतो. सोहळा नात्यांचा साजरा करणे हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या असून त्या लोकप्रियही होत आहेत.

वेगवेगळ्या नाते संबंधाची गोष्ट 'माझी माणसं' या सन मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना दिसत आहे. महाराष्ट्रातील मालवण या भागातील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मालिकेचे हे कथानक कोकणातील निसर्गसौंदर्याप्रमाणेच उत्तरोत्तर फुलत जाणार आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र गिरीजा नेहमीच दुर्लक्ष करते. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गिरीजा ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घर खर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, ती तिच्या जवळ असणारी आपली माणसं खरंच तिची आहेत का ह्या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे.

कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत. स्वकर्तुत्वावर जबाबदारी स्वीकारणाऱ्या 'गिरीजा'ची गोष्ट सन मराठीवर बघायला मिळेल.

कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

हेही वाचा - सिध्दू मुसेवालाच नाही...तर या पंजाबी कलाकारांचीही झाली होती दिवसा ढवळ्या हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.