ETV Bharat / entertainment

Movies and Web Series in August : 'ड्रीम गर्ल २', 'ओ माय गॉड २', 'गदर २'च्या सीक्वेलसह ऑगस्ट महिन्यात होणार ओटीटीवरही धमाल - ऑगस्ट महिन्यात भरपूर मनोरंजक चित्रपट

ऑगस्ट महिन्यात भरपूर मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. 'ड्रीम गर्ल २', 'ओ माय गॉड २', 'गदर २' यासारखे गाजलेले चित्रपटाचे सीक्वेल रिलीज होतील तर काही बिग बजेट वेब सिरीजही झळकतील. या संपूर्ण यादीवर एक नजर टाकूयात.

Movies and Web Series in August
सीक्वेलसह ऑगस्ट महिन्यात होणार ओटीटीवरही धमाल
author img

By

Published : Jul 31, 2023, 5:53 PM IST

मुंबई - ऑगस्ट महिन्यात रिलीज होणारे चित्रपट आणि ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या वेब सिरीज, शो आणि चित्रपट यामुळे हा महिना धमाल मनोरंजनाचा ठरणार आहे. या महिन्यात 'गदर २' आणि 'ओ माय गॉड'सारखे दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. तसेच दोन मोठ्या वेब सिरीजचेही प्रसारण सुरू होईल. त्यामुळे या सर्व चित्रपट आणि वेब सिरीजच्या संपूर्ण यादीवरुन एक नजर जरुर टाका.

ओ माय गॉड 2 - अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका असलेल्या 'ओ माय गॉड २' चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आतुरतेने करत आहेत. अमित रॉय दिग्दर्शत हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

गदर 2 - सनी देओलच्या 'गदर' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल २२ वर्षानंतर येत आहे. 'गदर २' मधून सनी देओल आणि आमिषा पटेलची जोडी पुन्हा एकत्र येईल. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'ओ माय गॉड' चित्रपटाशी टक्कर होणार आहे.

ताली - अभिनेत्री सुष्मिता सेन आगामी 'ताली' चित्रपटात ट्रान्स जेंडर कार्यकर्ती श्रीगौरी सावंतची भूमिका साकारत आहे. पहिल्यांदाच ती अशी व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटीवर १५ ऑगस्टपासून मोफत पाहाता येणार आहे.

ड्रीम गर्ल 2 - कॉमेडी चित्रपट 'ड्रीम गर्ल-2' हा ऑगस्ट महिन्यातील मोठे मनोरंजक आकर्षण असणार आहे. आयुष्मान खुरान आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी रिलीज होईल. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट राज शांडिल्य यांनी बनवला आहे. 'ड्रीम गर्ल'च्या या सीक्वेल चित्रपटात आयुष्मान खुराना, विजय राज, अन्नु कपूर यांच्यासह परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका असतील.

चूना - 'चूना' ही हिंदी वेब सिरीज ३ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा एक क्राइम पोलिटीकल ड्रामा आहे. जिमी शेरगिल, मोनिका पनवर, विक्रम कोच्चर. चंदन रॉय आणि नमित दास यांच्या या मालिकेत भूमिका आहेत. आठ भाग असलेली ही मालिका पुष्पेंद्र नाथ मिश्री यांनी लिहिली आणि बनवली आहे.

मेड इन हेवन सिझन 2 - झोया अख्तर, नित्य मेहरा, अलंकृता श्रीवास्तव आणि नीरज घायवान यांनी बनवलेली 'मेड इन हेवन २' ही मालिका १० ऑगस्टपासून सुरू होईल. या मालिकेचे ७ एपिसोड्स प्राईम व्हिडिओवर प्रसारित होतील. यामध्ये अर्जुन माथुर, शोभिता धुलिपाला, जिम सरभ, शशांक अरोड़ा, कल्कि कोयचलिन आणि शिवांगी रघुवंशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

द कश्मरी फाइल्स - अनरिपोर्टेड - 'मेड इन हेवन' मालिकेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची 'द कश्मीर फाइल्स- अनरिपोर्टेड' ही वेब सिरीज रिलीज होणार आहे. ही मालिका विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केली आहे.

हेही वाचा -

१. Zinda Banda Song Trolled : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाण्यावर भडकले ट्रोलर्स, अनेक गोष्टींवर आक्षेप

२. Made In Heaven Season 2 : झोया अख्तरचा 'मेड इन हेवन सिझन २' 'या' तारखेला होणार रिलीज

३. Raghava Lawrence Shares First Look : 'चंद्रमुखी २' मधील राघव लॉरेन्सचा 'वेट्टय्यान राजा' फर्स्ट लूक प्रसिद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.