ETV Bharat / entertainment

Dhondi Champya : रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी, 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' १६ डिसेंबरला होणार प्रदर्शित

रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली. येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhondi Champya
धोंडी चंप्या
author img

By

Published : Nov 3, 2022, 12:53 PM IST

मुंबई: रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली. येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या धमाल चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

हे कलाकार मुख्य भूमिकेत: प्रभाकर भोगले यांच्या कथेद्वारा प्रेरित होऊन बनवलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांनी लिहिली आहे. यात भरत जाधव (Bharat Jadhav), वैभव मांगले (Vaibhav Mangale) हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत सायली पाटील (Sayali Patil) आणि निखिल चव्हाण (Nikhil Chavhan) हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसतील.

प्रेमकथेत ट्विस्ट येणार: पोस्टरमध्ये धोंडी आणि चंप्या दिसत असून या दोघांमध्ये फुलणारी प्रेमकथा यात पाहायला मिळणार आहे. पोस्टरवरून हा एक धमाल विनोदी चित्रपट असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, 'सर्व वयोगटांसाठी असलेला हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. धोंडी आणि चंप्या यांचे प्रेम सफल होण्यासाठी त्यांचे मालक त्यांना मदत करणार की, त्यांच्या प्रेमकथेत आणखी काही ट्विस्ट येणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.'

संगीत: या चित्रपटातील गाण्यांना सौरभ दुर्गेश यांनी संगीत दिले असून गुरु ठाकूर, मंदार चोळकर, गणेश निगडे यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. तर या गाण्यांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सनाह मोईडुट्टी, सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभला आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्मित या चित्रपटाचे अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर सहनिर्माते आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.