ETV Bharat / entertainment

एका दशकानंतर दीपा परब चौधरीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन - दिपा परब चौधरी नवी मालिका

अभिनेत्री दीपा परब ही एक दशकानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आगमन करणार आहे. दीपाने यापूर्वी हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमध्ये उत्तम व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. जाहीरातीच्या क्षेत्रातही तिचे नाव मोठे आहे. ऑल द बेस्ट या नाटकापासून आपल्या करियरची सुरुवात केलेल्या दिपाने अनेक मराठी चित्रपटातूनही काम केले आहे.

दीपा परब चौधरी
दीपा परब चौधरी
author img

By

Published : Aug 13, 2022, 10:21 AM IST

मुंबई - सध्या वेब सिरीज, चित्रपट आणि मालिकांमध्ये मध्यमवयीन स्त्रियांच्या व्यक्तिरेखा भाव खाऊन जाताना दिसताहेत. अर्थातच आजकाल टेलिव्हिजन मालिकांमध्येही मध्यवर्ती भूमिकेत मध्यमवयीन स्त्री व्यक्तिरेखा पाहावयास मिळतात. त्यात अजून एका व्यक्तिरेखेचेची भर पडलीय ती म्हणजे 'तू चाल पुढं' मधील अश्विनीची. अश्विनीची भूमिका साकारत आहे दीपा परब जी एका दशकानंतर छोट्या पडद्यावर कम-बॅक करतेय.

'तू चाल पुढं' या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब- चौधरी जवळपास दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. या मालिकेत ती अश्विनीच्या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी अश्विनीला पाहिलं. ती गृहिणीच्या भूमिकेत दिसणार असून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी अश्विनी सादर करणार आहे.

या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना दीपा म्हणाली की, "वाहिनीकडून कडून मला फोन आला. अभिनेत्री हर्षदा खानविलकरने माझे नाव या भूमिकेसाठी टीमला सुचवले. खरंतर कमबॅक करण्यासाठी मी वाटच पाहत होती आणि संधी चालून आल्यावर ती मी लगेच स्वीकारली. माझी अश्विनी ही भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, समस्या, तिचं घराप्रती कर्तव्य या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेते. नवीन घर तयार व्हावं व त्यात आपलंही योगदान असावं, असा विचार करून ती स्वबळावर पैशाची बचत करते. मला विश्वास आहे की अश्विनी ही व्यतिरेखा प्रत्येक घरातील महिलेला आपलीशी वाटेल.”

'तू चाल पुढं' ही नवी मालिका येत्या १५ ऑगस्ट पासून प्रसारित होण्यास सुरुवात होईल.

हेही वाचा - संगीतकार अजय अतुलच्या उपस्थितीत कोण होणार करोडपती शोची होणार सांगता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.