ETV Bharat / entertainment

Kamara Deleted Morph Video : जर्मनीत पंतप्रधान मोदींसमोर गाणाऱ्या मुलाचा मॉर्फ व्हिडिओ कुणाल कामराने केला डिलीट

कॉमेडियन कुणाल कामरा ( Comedian Kunal Kamara ) याने जर्मनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गाणे गाताना ( boy singing in front of Prime Minister Modi ) एका मुलाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ ( morph video ) डिलीट केला आहे. गुरुवारी या प्रकरणावरून वाद उफाळून आल्यानंतर कामरा यांनी ट्विटरवरून व्हिडिओ डिलीट केला.

author img

By

Published : May 6, 2022, 10:50 AM IST

कॉमेडियन कुणाल कामरा
कॉमेडियन कुणाल कामरा

मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी दौऱ्यावर ( Prime Minister Narendra Modi's visit to Germany ) असताना त्यांना एका भारतीय मुलाने देशभक्तीपर गीत ( Patriotic song ) ऐकवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला होता. या मुलाने सुरुवातीला पीएम मोदींसमोर 'हे जन्मभूमी भारत' हे गाणे ( boy singing in front of Prime Minister Modi ) गायले होते. मॉर्फ केलेल्या व्हिडिओमध्ये त्या मुलाच्या मूळ गाण्याच्या जागी, 'महंगाई डायन खाये जात है', हे गाणे बदलण्यात आले होते. हा व्हिडिओ कॉमेडियन कुणाल कामराने( Comedian Kunal Kamara ) ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ व विरोधात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

कुणालवर विरोधकांनी भरपूर टीका केली. अशा प्रतिक्रियांचा सामना केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बर्लिन, जर्मनीमधील एका मुलाशी झालेल्या संवादाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ हटवला, जो त्याने यापूर्वी ट्विटरवर शेअर केला होता.

मुलाच्या वडिलांनी कॉमेडियन कुणाल कामराला "कचरा" (कचरा) असे म्हटले. मुलाचे वडील गणेश पोळ यांनी कामरा यांचे ट्विट रिट्विट केले की, "तो माझा 7 वर्षांचा मुलगा आहे, ज्याला हे गाणे आपल्या प्रिय मातृभूमीसाठी गाण्याची इच्छा होती."

"तो अजून लहान असला तरी तो नक्कीच त्याच्या देशावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. कामरा किंवा कचरा तुम्ही काहीही असलात तरी. गरीब मुलाला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवा आणि तुमच्या खराब विनोदांवर काम करण्याचा प्रयत्न करा," असे गणेश पोळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या मुलाचा "डॉक्टरेड" व्हिडिओ ट्विट केल्याबद्दल बालहक्क संस्था NCPCR ने कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा - Sanjay Kapoor Remembers Prem :संजय कपूरच्या बॉलिवूड पदार्पणाची 32 वर्षे पूर्ण, जागवल्या आठवणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.