ETV Bharat / entertainment

Bigg Boss 16: श्रीजिताचा अपमान करणाऱ्या मन्या सिंगला सलमान खानने घेतले फैलावर - बिग बॉस 16 मध्ये शुक्रवार का वार

बिग बॉस 16 मध्ये शुक्रवार का वार एपिसोडचा प्रोमोतून लक्षात येते की, मन्या सिंगला शोचा होस्ट सलमान खानकडून बोलणी खावी लागत आहे. प्रोमोमध्ये मन्या सिंगने श्रीजिता डेचा अपमान केल्याचे उघड दिसत आहे. यावरुन सलमानने तिला चांगलेच झापले आहे.

मन्या सिंगला सलमान खानने घेतले फैलावर
मन्या सिंगला सलमान खानने घेतले फैलावर
author img

By

Published : Oct 7, 2022, 1:11 PM IST

मुंबई - 1 ऑक्टोबर रोजी प्रीमियर झाल्यानंतर, बिग बॉस 16 मध्ये आज रात्री सीझनचा पहिला 'शुक्रवार का वार' हा भाग होणार आहे. आगामी एपिसोडमध्ये, स्पर्धक मन्या सिंग आणि श्रीजिता डे हे दोघे भांडताना दिसणार आहेत. मन्या आणि श्रीजीता यांचे कडाक्याचे भांडण का झाले हे हा एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल. पण शुक्रवार का वार एपिसोडचा प्रोमो सूचित करतो की मन्याला शोचा होस्ट सलमान खानकडून काही कानगोष्टी ऐकायला मिळतील.

बिग बॉस 136 च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये, मन्या श्रीजितावर रॅटिंगचा आरोप करताना दिसत आहे. मिस इंडिया उपविजेत्या असलेल्या मन्यानेही श्रीजिताचा अपमान केला, "या देशाची मी राजदूत होते. तू काय आहेस? टेलिव्हिजन अभिनेत्री?" प्रोमोच्या शेवटी, असे दिसून आले आहे की, श्रीजिताशी असलेल्या मन्याच्या वागण्यावर सलमान उघडपणे खूश नाही.

श्रीजिताचा अपमान केल्याबद्दल मन्याला झापताना सलमान "मन्या के हिसाब से यह अंगार है और बाकी के सब भंगार है" असे म्हणताना दिसतो. सलमान मन्याला तिच्या या वृत्तीबद्दल धडा शिकवेल असे दिसते. प्रोमो ड्रॉप झाल्यापासून, उत्तरनमधील मुक्ताच्या भूमिकेनंतर घराघरात नावारूपाला आलेल्या श्रीजीताला मन्याने बदनाम करताना पाहून नेटिझन्सला धक्का बसला आहे. ती कसौटी जिंदगी की, अन्नू की हो गई वाह भाई वाह आणि नजर यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

याआधी मन्या इमली फेम सुंबूल तौकीर खानशी भांडताना दिसली होती. तिने सुंबुल आणि शालिन भानोत यांच्यावर शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची नक्कल केल्याचा आरोपही केला होता आणि शोमधील त्यांच्या बाँडला खोटे म्हटले होते.

हेही वाचा - निर्माती म्हणून क्लॅपबोर्डवर नाव झळकल्याने करीना कपूर उत्साहीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.