ETV Bharat / entertainment

Angira Dhar IMDb Breakout Star : अंगिरा धरला बनली वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार, आयएमडीबीची घोषणा - Angira Dhar crowned IMDbs 2nd Breakout

आयएमडीबीने अभिनेत्री अंगिरा धर हिला वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार म्हणून घोषित केले आहे. अंगिराने अलीकडेच स्ट्रीमिंग कॉमेडी सास, बहू और फ्लेमिंगोमध्ये भूमिका साकारली होती.

Angira Dhar IMDb Breakout Star
अंगिरा धरला बनली वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार
author img

By

Published : Jul 6, 2023, 6:59 PM IST

मुंबई - अलीकडेच सास, बहू और फ्लेमिंगो या वेब सिरीजने सोशल मीडियावर भरपूर चर्चा घडवून आणली. या स्ट्रीमिंग मालिकेत दिसलेली अभिनेत्री अंगिरा धर हिला आयएमडीबी ( IMDb ) च्या वर्षातील दुसरा ब्रेकआउट स्टारचा मुकुट मिळाला आहे. सास, बहू और फ्लेमिंगो मधील तिच्या कामामुळे ही ओळख तिला मिळाली असून खूप सकारात्मक प्रतिसाद तिला मिळाला. अभिनेत्री अंगिरा धरने शेअर केले की तिला माहित आहे की स्ट्रीमिंग शो तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरेल.

इंस्टाग्रामवर बातमी शेअर करताना, इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDB) ने पोस्ट केले: 'स्टार आऊट ऑफ बॅग आहे. अंगिता धरला आयएमडीबी ब्रेकआऊट स्टार पुरस्कार देताना थ्रिलंगीं वाटतंय. अंगिराने डिस्ने हॉटस्टारवरील सास, बहू और फ्लेमिंगोमध्ये काजल ही भूमिका साकारली होती. आयएमडीबी ब्रेकआऊट स्टार हा स्टार मिटर पुरस्कार जो कलाकार आयएमडीबी सर्चेसच्या आधारे तुमच्या नजरा रोखून धरायला लावतो आणि पडद्यावरील अप्रतिम कामगिरीने आपली एक अमिट छाप तुमच्या हृदयात उमटवतो अशा व्यक्तीला दिला जातो. जगभरातून आयएमडीबीला २०० दशलक्षाहून अधिक मासिक अभ्यागतांच्या पृष्ठदृश्यांवरून हे निर्धारित केले जाते!'

याबद्दल बोलताना अभिनेताअंगिता धर म्हणाली की, 'मला माहित होते की सास, बहू और फ्लेमिंगो हा माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट असेल. असे अनेक क्षण होते जेव्हा मला असे वाटले की ते केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर माझे आयुष्य हीचांगले बदलेल. एका अभिनेत्रीमध्ये तुम्हाला प्रगती दिसली. कारण सास बहू और फ्लेमिंगोमध्ये मी एक अतिशय उत्कट पात्र साकारत होते.'

तिच्या व्यक्तिरेखेवर भाष्य करताना, तिने पुढे नमूद केले, काजल अत्यंत वेगवेगळे स्तर असलेली आणि गुंतागुंतीची आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेमध्ये केलेल्या कामामुळे अंगिरा म्हणून माझ्याबद्दल गोष्टी शोधण्यात मला मदत झाली. याने माझ्या करिअरच्या दृष्टीनेच नाही तर वैयक्तिकरित्या देखील खूप काही केले. रिअल लाइफ अंगिरा गुप्त भूमिगत व्यवसाय चालवण्यासह तिच्या इच्छेनुसार काहीही करण्यास सक्षम आहे. याआधी, फर्जी वेब सिरीजचा भुवन अरोरा २०२३ चा पहिला ब्रेकआउट स्टार बनला होता.

हेही वाचा -

१. Divya Khosla Kumars Mother Passed Away : दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन, फोटोसह शेअर केली दु:खद बातमी

२. Sushmita Sen : सुष्मिता सेनने आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर केला डान्स...

३. Amruta In Sacred Games 2 : अमृता सुभाषने सांगितली इंटिमेट सीन्सची आठवण, मासिक पाळीच्या तारखा लक्षात घेऊन झाले होते शुटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.