मुंबई - कॉमेडी स्टार कपिल शर्माचा नवीन चित्रपट झ्वीगाटोचा ट्रेलर सोमवारी (19 सप्टेंबर) रिलीज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आहे. हा चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारत आहे.
कपिलच्या अभिनयाची परीक्षा - 1.40 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कपिल शर्माने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. कपिल शर्माने आपल्या खुसखुशीत शैलीत बदल करून आपण गंभीर अभिनय करू शखतो हे सिद्ध केले आहे. अभिनेत्री शहाना गोस्वामीने अभिनेता कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दोघेही आपापल्या भूमिकांमध्ये इतके मग्न झाले आहेत की ही कथा खरी आहे की सिनेमॅटिक आहे हे वेगळे करणे कठीण होते. दिग्दर्शिका नंदिता दास हिने हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नंदिताने समाजात पसरलेले दारिद्र्य आणि गरीब लोकांच्या दैनंदिन समस्यांवर प्रकाश टाकला आहे.
झ्वीगाटोची कथा - कपिलच्या झ्वीगाटो चित्रपटाची कथा फूड डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या भीषण गरिबीवर आधारित आहे. ट्रेलरमधील डिलिव्हरी बॉयची ही अवस्था पाहून तुमच्याही घशाला कोरड पडू शखते. याआधी या चित्रपटाच्या रिलीज झालेल्या टीझरमध्ये कपिल अतिशय संयमी अभिनय करताना दिसला होता.
कपिल शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी केली होती की, 47 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झ्विगाटोचा प्रीमियर होणार आहे. नुकताच प्रीमियर झाल्यानंतर कपिल शर्माने चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटाचा प्रीमियर कंटेम्परेरी वर्ल्ड सिनेमामध्ये झाला होता.
हेही वाचा - परिणीती चोप्रा आणि हार्डी संधूच्या कोड नेम तिरंगाची रिलीज तारीख ठरली