ETV Bharat / entertainment

अनिता राजसोबत स्क्रिन शेअर करतेय झरीना वहाब, दिग्गज अभिनेत्रींचे मोठ्य पडद्यावर पुनरागमन - Lafjon Mein Pyaar Ki Shooting Begins

अनिता राज पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे ८० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री राहिलेल्या झरीना वहाबसोबत अनिता राज पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. त्यांच्या लफजों में प्यार की या नवीन चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे.

झरीना वहाबसोबत अनिता राज
झरीना वहाबसोबत अनिता राज
author img

By

Published : Nov 8, 2022, 4:01 PM IST

मुंबई - छोटी सरदारनी या मालिकेनंतर अभिनेत्री अनिता राज हे नाव घराघरात पुन्हा पोहोचले आहे. खरंतर अनिता राज ही बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहे. ८० आणि ९० असे दोन दशके मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अनिता राज पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे ८० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री राहिलेल्या झरीना वहाबसोबत अनिता राज पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. त्यांच्या लफजों में प्यार की या नवीन चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. चित्रपटात अनिता राज, झरीना वहाब यांच्या शिवाय, ललित परीमू आणि मीर सरवर यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.

अनिता राजसोबत स्क्रिन शेअर करतेय झरीना वहाब

झरीना वहाब आणि अनिता राज पहिल्यांदाच लफ्जों में प्यार या हिंदी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. आज चित्रपटातील अनेक महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले ज्यामध्ये अनिता राज, झरीना वहाब, ललित परीमू, मीर सरवर, विवेक आनंद मिश्रा, कांचन राजपूत, प्रशांत राय, वाणी डोगरा यांच्यावर अनेक दृश्ये चित्रित करण्यात आली. चित्रपटाची कथा एका संगीत शिक्षकावर आधारित आहे जो आपल्याच विद्यार्थ्याच्या प्रेमात पडतो आणि त्याच्यासाठी कविता लिहितो. चित्रपटाची पटकथा धीरज मिश्रा आणि यशोमती देवी यांनी लिहिली आहे तर रणदीप गिरी यांच्या सहकार्याने धीरज राजा दिग्दर्शन करत आहेत.

चित्रपटातील गाणी प्रसिद्ध अशोक साहनी साहिल यांनी लिहिली आहेत, जी अतिशय रोमँटिक आहे. चित्रपटाची निर्मिती मोनार्क फिल्म्स अंतर्गत होत आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले असून, काही दिवसांनी टीम भदरवाह काश्मीरला जाणार आहे. या चित्रपटात विवेक आनंद मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत तर तीन नायिका अनुक्रमे कांचन राजपूत, वाणी डोगरा, महिमा गुप्ता आहेत. मेघा जोशी आणि प्रशांत राय सहकलाकार आहेत.

संगीताबद्दल बोलायचे झाले तर प्रसिद्ध गायक काबुल बुखारी, रणजीत राजवाडा आणि अंजू पंता यांच्या गाण्यांचा समावेश आहे. लेखक धीरज मिश्रा यांचा पहिला रोमँटिक चित्रपट असेल, याआधी त्यांनी जय जवान जय किसान, चापेकर ब्रदर्स, गालिब, हिरो ऑफ नेशन चंद्रशेखर आझाद असे अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. धीरजने सांगितले की, लफ्जों में प्यार या चित्रपटात अनिता राजजीची भूमिका अतिशय सशक्त आहे, जरी ती हीरोची वहिनी बनली असली तरी तिची भूमिका ही कथेचा मुख्य आधार आहे. झरिना वहाबसोबत पहिल्यांदाच काम करण्यासाठी अनिता राज खूप उत्सुक आहे.

हेही वाचा - Bebhan Movie : विद्युत जामवालने अनुपसिंग ठाकूरला दिल्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.