मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार झेप घेतली आहे. या चित्रपटाने 19 व्या दिवशी लाखोंची कमाई केली होती. दरम्यान 20व्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईने पुन्हा एकदा 10 कोटींचा पल्ला गाठला आहे. हा चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची मने जिंकत आहे. या 20 दिवसांत या चित्रपटाने 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे १६ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या आदिपुरुष या वादग्रस्त चित्रपटाला झालेल्या प्रचंड विरोधाचा फायदा जरा हटके जरा बचकेला मिळत आहे. या 20 दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे या बातमीद्वारे बघूया...
-
The absence of major film/s this Fri should help #ZaraHatkeZaraBachke cross ₹ 75 cr in Wknd 4… ₹ 80 cr *lifetime biz* cannot be ruled out… [Week 3] Fri 1.08 cr, Sat 1.89 cr, Sun 2.34 cr, Mon 1.08 cr, Tue 99 lacs, Wed 1.08 cr. Total: ₹ 71.46 cr. #India biz. #ZHZB #Boxoffice pic.twitter.com/NnhS9xt33l
— taran adarsh (@taran_adarsh) June 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The absence of major film/s this Fri should help #ZaraHatkeZaraBachke cross ₹ 75 cr in Wknd 4… ₹ 80 cr *lifetime biz* cannot be ruled out… [Week 3] Fri 1.08 cr, Sat 1.89 cr, Sun 2.34 cr, Mon 1.08 cr, Tue 99 lacs, Wed 1.08 cr. Total: ₹ 71.46 cr. #India biz. #ZHZB #Boxoffice pic.twitter.com/NnhS9xt33l
— taran adarsh (@taran_adarsh) June 22, 2023The absence of major film/s this Fri should help #ZaraHatkeZaraBachke cross ₹ 75 cr in Wknd 4… ₹ 80 cr *lifetime biz* cannot be ruled out… [Week 3] Fri 1.08 cr, Sat 1.89 cr, Sun 2.34 cr, Mon 1.08 cr, Tue 99 lacs, Wed 1.08 cr. Total: ₹ 71.46 cr. #India biz. #ZHZB #Boxoffice pic.twitter.com/NnhS9xt33l
— taran adarsh (@taran_adarsh) June 22, 2023
20 व्या दिवशी किती कमाई केली? : मिमी फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके' हा मध्यमवर्गीय कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना विक्की आणि साराची फ्रेश जोडीही पाहायला मिळाली आहे. चाहत्यांना ही जोडी खूप आवडत असून लोकही त्यांना भरभरून प्रेम देत आहेत. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने 20 व्या दिवशी 1.08 कोटींचा व्यवसाय केला आहे. 19व्या दिवशी 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिसवर 99 लाख रुपयांची कमाई केली.
चित्रपटाचे एकूण कलेक्शन? : 'जरा हटके जरा बचके'च्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 71.46 कोटींची कमाई केली आहे. आता तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट किती कमाई करतो आणि आदिपुरुषच्या स्वस्त तिकीटांचा परिणाम या चित्रपटावर होईल का, हे या वीकेंडला कळेल. दरम्यान, प्रभास, क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खान-स्टारर आदिपुरुषने बुधवारी 7.50 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट समीक्षक तरण आदर्श,यांच्या मते, जरा हटके जरा बचके या शुक्रवारपर्यत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. तसेच अविका गोर अभिनीत फक्त कृष्णा व्ही. भट्ट यांचा हॉरर पिक्चर '1920 हॉरर्स ऑफ द हार्ट' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 29 जूनपासून सुरू होणार्या वीकेंडमध्ये पुढील आठवड्यात नवीन चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सत्यप्रेम की कथा, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :